Tunisha Suicide Case : तुनिषावर 26 डिसेंबरला अंत्यसंस्कार होणार; उशिरा होण्याचं हे आहे कारण

अभिनेत्री तुनिषा शर्मा हिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट 26 डिसेंबरला येणार आहे.
Tunisha Sharma
Tunisha Sharma Dainik Gomantak
Published on
Updated on

टिव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबरला अली बाबा या सिरीयलच्या सेटवर मेक- अप रुममध्ये आत्महत्या केली होती. या आत्महत्येच्या मागे काही घातपात नाही ना हे समजण्यासाठी आता 26 डिसेंबरची म्हणजे उद्याची वाट बघावी लागणार आहे.

टिव्ही सिरीयल 'अली बाबा' मध्ये काम करणारी अ‍ॅक्ट्रेस तुनिषा शर्माची धक्कादायक आत्महत्या इंडस्ट्रीला हादरवुन गेली आहे. 24 डिसेंबरला दुपारी 3.30 वाजता तिने पंख्याला लटकुन आत्महत्या केली.

त्या अवस्थेत तिला हॉस्पीटलला नेण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या आत्महत्येचं कारण कळु शकलं नसलं तरी पोलिसांनी प्राथमिक संशयावरुन तुनिषाचा को-स्टार शीजान मोहम्मद खान याला अटक केली आहे. तुनिषाच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली आहे.

तुनिषावर अंत्यसंंस्कार आज 25 डिसेंबरला होणार होते ;पण काही नातेवाईक चंदीगड वरुन येणार असल्याने अंत्यसंंस्कार 26 तारखेला होणार असल्याची माहिती मिळाली आहे.रात्री उशीरा तुनिषाचं शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं. पोस्टमॉर्टम पुर्ण झाले असले तरी मृतदेह अजुनही नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला नाही. मृतदेह 26 तारखेला 11 वाजता नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल . सध्या तुनिषाचं शव जे.जे हॉस्पीटलमध्ये ठेवण्यात आलं असुन ते उद्या मीरा रोडच्या तुनिषाच्या घरी नेण्यात येईल.

Tunisha Sharma
OTT Platform and Cinema : मोठमोठ्या कलाकारांना भुरळ पाडतोय ओटीटी प्लॅटफॉर्म

तुनिषाचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला असला तरी पोलिसांनी तो अद्याप सार्वजनिक केला नाही. श्वास थांबल्याने हा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. यात तुनिषाच्या प्रेग्नंट असण्याची शक्यता वर्तवली आहे. शीजान मोहम्मद खान याच्यासोबत बऱ्याच काळापासुन रिलेशनमध्ये होती. पोलीसांचा तपास त्याही अंगाने सुरू आहे.

दरम्यान पोलिसांनी शीजान मोहम्मद खान याला वसई कोर्टात हजर केले. पोलिसांनी कोर्टाकडे 5 दिवसांची रिमांड मागितली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com