Tunisha Sharma Suicide Case : टिव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर टिव्ही इंडस्ट्री चांगलीच हादरली आहे. तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात 'ऑल इंडिया सीने वर्कर्स एसोसिएशन'चे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी सरकारकडे SIT तपासाची मागणी केली आहे . गुप्ता म्हणतात कि,
"ज्या सेटवर तुनिषाने आत्महत्या केली त्या सेटवर मी जाऊन आलोय, काहीतरी गडबड झालीय, सेटवर महिला सुरक्षित नाहीत"
फक्त 20 वर्षांच्या तुनिषाने आत्महत्या केल्याने इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. तसं बघता एखाद्या कलाकाराने आत्महत्या करणे ही काही नवी गोष्ट नाही पण अशा घटना काही प्रश्न निर्माण करतात.अभिनेता सुशांत सिंह रजपुत च्या आत्महत्येला 2 वर्षे पुर्ण झाली नसतील तेवढ्यात इंडस्ट्रीला हा दुसरा धक्का बसला आहे. पण तुनिषाच्या या केसमध्ये असं काहीतरी जरुर आहे ज्यामुळे इंडस्ट्रीमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
'ऑल इंडिया सीने वर्कर्स असोसिएशन'चे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी याबाबतीत गंभीर विधान केले आहे. ते म्हणतात मी त्या सेटवर जाउन आलो तिथे लोक घाबरलेले आहेत. याबाबतीत SIT करण्यात यावा काही धक्कादायक गोष्टी समोर येतील असंही गुप्ता म्हणाले.
AICWA या संघटनेने ट्विट करत इंडस्ट्रीत वाढत असलेल्या आत्महत्यांच्या बाबतीत चिंता व्यक्त केली आहे. अभिनेत्री तुनिषावर 27 डिसेंबरला अंत्यसंस्कार करण्यात येतील. तुनिषाने बालकलाकार म्हणुन काम करायला सुरूवात केली होती. फितूर, बार बार देखो, कहानी 2, दबंग 3 या चित्रपटांतुन काम केलं होतं. इंडस्ट्रीत भयाण सत्य अशा घटनांमधुन वारंवार समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी तुनिषाचा प्रियकर शीजान मोहम्मद खान याला अटक केली असुन काही धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.