Tu Jhoothi Mai Makkar Trailor: 'तू झूठी मैं मक्कार' चं ट्रेलर रिलीज...चित्रपटाच्या नावाप्रमाणेच ट्रेलरही अतरंगी...

लव रंजन दिग्दर्शित तू झूठी मै मक्कार चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच याचं ट्रेलरही अतरंगी आहे
Ranbir Kapoor 
Shradha Kapoor
Ranbir Kapoor Shradha KapoorDainik Gomantak

लव रंजन एक दिग्दर्शक आहे ज्याचे आतापर्यंत आलेले सगळे चित्रपट अतरंगी नावाचे आणि एक वेगळी कथा घेऊन येणारे असतात. आता त्याचा आगामी तू झूठी मै मक्कारही त्याच पठडीतला चित्रपट असणार आहे.

'तू झूठी मैं मक्कार'चा ट्रेलर आज एका मेगा इव्हेंटमध्ये रिलीज करण्यात आला असून, याला प्रेक्षकांच्या जबरदस्त प्रतिक्रिया मिळाल्या. या ट्रेलर बघुन या गोष्टीची निश्चित कल्पना येते कि ही एक हा चित्रपट उत्कृष्ट केमिस्ट्री, उत्कृष्ट व्हिज्युअल्स, उत्तम डायलॉग्स या सगळ्यांसोबत एका नव्या गोष्टीसह सर्वांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाद्वारे पदार्पण करणार्‍या स्टँड-अप किंग अनुभव सिंग बस्सी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करत आपल्या विनोदी वन लाइनर्सने सर्वांचे मनोरंजन केले आणि वर्षातील सर्वात मनोरंजक ट्रेलर लॉन्चसाठी माहोल सेट केला. तसेच, कार्यक्रमादरम्यान जेव्हा 'झूठी' श्रद्धा आणि 'मक्कार' रणबीर यांनी दिग्दर्शक लव रंजनसोबत स्टेज शेअर केले तेव्हा आपले किस्से सांगत त्यांनी सर्वांचे मनोरंजन केले.

चित्रपटाचं ट्रेलर बघुन या गोष्टीची निश्चित कल्पना येते की चित्रपटाच्या शूटिंगमध्ये जेवढी मजा येते तेवढीच ती पडद्यावर देखील दिसून येते. अशातच, या ट्रेलरमध्ये प्रीतम, अमिताभ भट्टाचार्य आणि अरिजित सिंग यांच्या एकत्र येण्याबरोबरच चित्रपटाच्या गोड संगीताची झलकही पाहायला मिळते.

Ranbir Kapoor 
Shradha Kapoor
KL Rahul-Athiya Shetti: प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला राहुल-अथियाचे शुभमंगल...

प्रेक्षकांनी एक रिअल युथ रोम-कॉम चित्रपटाची दीर्घकाळ वाट पाहिलीय त्यामुळे 'तू झूठी मैं मक्कार'या सिनेमाने निश्चितपणे सर्व बॉक्सेसमध्ये टिकमार्क केले आहे. दरम्यान, आता या ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे.

लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित 'तू झूठी मैं मक्कार'या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com