Trisha Krishnan : "विजयसोबत काम करताना मला" अभिनेत्री त्रिशा कृष्णनने सांगितला लिओ चित्रपटाचा अनुभव

गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर थलपती विजयच्या लिओची चर्चा सुरु आहे.
Trisha Krishnan
Trisha Krishnan Dainik Gomantak
Published on
Updated on

Trisha Krishnan on Thalpathy Vijay : लिओ चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर विजय मिळवलेल्या अभिनेता थलपती विजयचा गेल्या काही दिवसांपासून बोलबाला आहे. विजयसोबत लिओ चित्रपटात साऊथची सुंदरी त्रिशानेही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. नुकतीच त्रिशाने एक मुलाखत दिली आहे.

त्रिशा कृष्णन

साऊथची दिग्गज अभिनेत्री त्रिशा तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या लिओ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. लिओ बॉक्स ऑफिसवरही यश दाखवत आहे. 

यावर्षी त्रिशाच्या दोन चित्रपटांनी प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे, ज्यात मणिरत्नमचा 'पोनियिन सेल्वन: II' आणि विजयचा 'लिओ' यांचा समावेश आहे. 

आता अलीकडेच अभिनेत्री त्रिशाने विजयसोबत लिओमध्ये काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला आहे आणि अभिनेत्याला सुपरस्टार देखील म्हटले आहे.

त्रिशा म्हणाली

नुकत्याच झालेल्या मुलाखतीत त्रिशाने विजयसोबत काम करण्याचा तिचा अनुभव सांगितला आणि म्हणाली, 'खर सांगू, जेव्हा तुम्ही एकाच व्यक्तीसोबत इतके चित्रपट केलेत तेव्हा तुम्हाला आराम वाटतो. 

आता आम्हाला पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र कधी दिसणार, असा प्रश्न लोक विचारत आहेत. त्यामुळे लोकांना आमची केमिस्ट्री आवडते हे ऐकून मला खूप आनंद झाला. त्यामुळे या चित्रपटातील आमची जोडी लोकांना खूप आवडली.

विजयशी भेट

त्रिशा पुढे म्हणाली, 'मी 19 किंवा 20 वर्षांची असताना पहिल्यांदा विजयला भेटले होते. म्हणून, जेव्हा तुमची 20 वर्षांहून अधिक काळ एखाद्याशी मैत्री असते आणि नंतर त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते, तेव्हा असे वाटते की तुम्ही घरी परतला आहात. लिओ या चित्रपटात लोकेशने आमच्यातील मैत्री पूर्णपणे अधोरेखित केली आहे.

Trisha Krishnan
निक जोनाससाठी प्रियांकाचं करवाचौथ व्रत...व्हायरल फोटो पाहाच

त्रिशा - विजयचे चित्रपट

त्रिशा आणि विजय यांनी गिली, 96, कुरुवी आणि थिरुपाची सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे 2008 मध्ये प्रदर्शित झालेला कुरुवी हा त्यांचा शेवटचा सहयोग होता. त्याचा नवीन चित्रपट लिओ जागतिक बॉक्स ऑफिसवर 550 कोटींचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com