Kuch kuch Hota Hai: 'कुछ कुछ होता है' ची सिल्व्हर ज्युबिली, स्पेशल स्क्रिनिंगला काजोलची दांडी

Kuch kuch Hota Hai: जितके करणचे आयुष्य असणार आहे तितकेच या चित्रपटाचे देखील वय असणार आहे. काळाला पुरुन उरणारा हा चित्रपट असल्याच्या भावना शाहरुखने व्यक्त केल्या आहेत.
Kuch kuch Hota Hai Team
Kuch kuch Hota Hai Team Dainik Gomantak

Kuch kuch Hota Hai: बॉलीवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत. त्यांचे महत्व वर्षानुवर्षे टिकून राहते. त्यांची फॅनफॉलॉइंग कधीच कमी होत नाही. असाच एक चित्रपट म्हणजे कुछ कुछ होता है हा आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर असे काही राज्य केले की इतिहास निर्माण झाला आहे. आजही या चित्रपटाला तितकेच प्रेम मिळते. आज या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहे.

करण जौहरने हा चित्रपट प्रदर्शित करत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. काजोल, राणी मुखर्जी आणि शाहरुखने निभावलेल्या पात्रांमुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला होता.

राणी मुखर्जी आणि शाहरुख खान हजर मात्र काजोलची गैरहजरी

धर्मा प्रोडक्शनच्या या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या मुंबईत कुछ कुछ होता है या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. या कार्यक्रमाला करण जौहरसोबत राणी मुखर्जी आणि शाहरुख खान देखील हजर होते. मात्र काजोल या कार्यक्रमाला हजर राहू शकली नाही.

शाहरुखने व्यक्त केल्या आपल्या भावना

या स्पेशल स्क्रीनिंगवेळी शाहरुखने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेक चित्रपट येतात, जातात. काही चित्रपट लक्षात राहतात, काही राहत नाही. मात्र कुछ कुछ होता है या चित्रपटाने सगळ्यांना वेड लावले. जितके करणचे आयुष्य असणार आहे तितकेच या चित्रपटाचे देखील वय असणार आहे.

काळाला पुरुन उरणारा हा चित्रपट असल्याचे मत शाहरुख( Shahrukh khan )ने व्यक्त केले आहे. पुढे शाहरुख म्हणतो, सगळ्यांना वाटतं करण माझा मित्र आहे, पण तसं नाही करणचे वडील यश जौहर माझे मित्र होते. जेव्हा हा चित्रपट आला तेव्हा करणचे वय २४-२५ वर्षे होते. जेवढे आता माझ्या मुलाचे आर्यनचे वय आहे. मला आनंद आहे कि मी हा चित्रपट केला.

करणने सांगितले वडील चित्रपटाबद्दल काय म्हणाले होते?

करणने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझा हा पहिला चित्रपट ( Movie )होता. माझ्या करिअरचा प्रवास इथून सुरु झाला. माझे वडील यश जौहर यांनी मला म्हटलं होतं, हा तुझा चित्रपट अव्हरेज जरी चालला तरी तुझे यामध्ये करिअर आहे. पण हा चित्रपट चांगला चालला.

दरम्यान, करण, राणी आणि शाहरुख तिघेही या कार्यक्रमादरम्यान उत्तम दिसत होते. धर्मा प्रोडक्शनने त्यांचा फोटो शेअर करत तुम्हा सगळ्यांना एकत्र बघून बहुत कुछ होता है असे म्हटले आहे. आज अंजलीला मिस केले असेही त्यांनी कॅप्शनमध्ये लिहले आहे.

Kuch kuch Hota Hai Team
Akshay Kumar: मोदींचं गाणं ऐकून बॉलीवूडच्या खिलाडीला आलं टेन्शन; म्हणाला 'आता आम्ही कुठे जायचं...?'

काजोल गैरहजर राहण्यामागे 'हे' आहे कारण

आता अनेकांना हा प्रश्न पडला होता की काजोल या स्पेशल स्क्रिनिंगला का हजर राहिली नाही. तर शाहरुखने याचे कारण सांगितले आहे. काजोल तिच्या तिच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे मात्र तिने शाहरुखजवळ निरोप दिला आहे सगळ्यांना माझ्याकडून प्रेम सांग. त्यामुळे काजोलच्या चाहत्यांना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले आहे.

प्रेम आणि मैत्रीवर आधारित असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना आजही भूरळ घालतो. धर्मा प्रोडक्शनचा हा चित्रपट यश जौहर यांनी प्रोड्युस केला होता. तर करण जौहरने या चित्रपटाची कथा लिहली होती आणि दिग्दर्शनही केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com