Chris Kirshbaum: 'खेळातून व्यक्त होणारे हावभाव आदिम असतात'; ॲनिमेटर ख्रिस यांचा स्पेशल Master Class

Chris Kirshbaum At IFFI 2024: गाजलेल्या अनेक ॲनिमेशन चित्रपटांसाठी ख्रिस कर्शबॉऊम यांनी काम केले आहे. ॲनिमेटर असण्याबरोबरच ते एक उत्तम शिक्षक आणि सार्वजनिक वक्ते देखील आहेत. स्पेशल इफेक्ट आर्टिस्ट म्हणून २ डी आणि ३ डी अशा दोन्ही प्रकारच्या ॲनिमेशन कामावर त्यांचे प्रभुत्व आहे.
Chris Kirshbaum At IFFI 2024
Chris KirshbaumDainik Gomantak
Published on
Updated on

Chris Kirshbaum Master Class About Animation At IFFI 2024

गाजलेल्या अनेक ॲनिमेशन चित्रपटांसाठी ख्रिस कर्शबॉऊम यांनी काम केले आहे. ॲनिमेटर असण्याबरोबरच ते एक उत्तम शिक्षक आणि सार्वजनिक वक्ते देखील आहेत. स्पेशल इफेक्ट आर्टिस्ट म्हणून २ डी आणि ३ डी अशा दोन्ही प्रकारच्या ॲनिमेशन कामावर त्यांचे प्रभुत्व आहे.

कॅरेक्टर ॲनिमेटर, सुपरवायझर असे प्रत्यक्ष काम करताना 2007 पासून त्यांनी ॲनिमेशनचे शिक्षणही अनेकांना दिले आहे.‌ ‘थ्रिल ऑफ व्हिक्टरी’ या त्यांच्या मास्टर क्लासमध्ये खेळ आणि ॲनिमेशन यामधील संबंध उलगडून दाखवताना, अप्रत्यक्षपणे ‘अभिनय’ या घटकाचे अनेक महत्त्वपूर्ण पैलू (मानसशास्त्रासहित) त्यांनी प्रभावीपणे स्पष्ट केले. एक मास्टर क्लास कसा असावा याचे हे सत्र साक्षात उदाहरण होते.

खेळ हे एक प्रकारचे शारीरिक आणि मानसशास्त्रीय नाट्यच असते. ख्रिस यांनी ॲनिमेटर म्हणून आपली कारकीर्द तरुणपणीच सुरू केली होती. मात्र भारतात ते फिरायला आलेले असताना, कलकत्त्यात, सहज म्हणून ते तिथल्या मुलांबरोबर एका गल्लीत क्रिकेट खेळले आणि त्यांना खेळातील‌ प्रभावशाली नाट्याची जाणीव त्या मुलांच्या रोमांचक भावनांचे निरीक्षण करताना झाली. ख्रिस म्हणतात, ‘‘विजयातील रोमान्स आणि पराजयातील निराशा यामधून व्यक्त होणाऱ्या देहबोलीतून, शरीराच्या हालचालीतील विलक्षण शक्तीची ओळख मला घडली.

खेळातून व्यक्त होणारे हावभाव हे आदिम असतात आणि त्याद्वारे अविष्कृत होणारे नाट्य हे अगदी खरे असते. त्यात कोणत्याही प्रकारची कृत्रिमता नसते. हार होत असताना प्रत्येक खेळाडू मानसशास्त्रज्ञांनी सिद्ध केलेल्या नकार/राग/सौदा/निराशा/स्वीकार या मानसशास्त्रीय अवस्थांमधूनच जात असतो.’’

आपले वरील मत मांडताना ख्रिस यांनी ऑलम्पिकमधील रिले रेसच्या व्हिडिओ क्लिपचा आधार घेऊन मानवी भावनांच्या विविध अवस्थांचे विश्लेषण फारच सुंदर तऱ्हने केले आणि खेळादरम्यान होणाऱ्या खेळाडूंच्या देहाविष्कारांचा उपयोग एक ॲनिमेटर कशाप्रकारे करून घेऊ शकतो याचे एक उत्कृष्ट प्रात्यक्षिक दिले. ‘जर आपल्याला विविध मानवी भावनांचे चित्रण करायचे असेल तर ईर्ष्येने खेळल्या जाणाऱ्या खेळादरम्यान माणसांच्या होणाऱ्या हालचाली त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव याचा अभ्यास अवश्य करायला हवा. जर ॲनिमेशन करत असताना ॲनिमेटर एखाद्या ठिकाणी अडत असेल तर खेळाच्या व्हिडिओ क्लिप्स त्याला नक्कीच मदत करू शकतील’, हे ख्रिस यांचे सांगणे होते. 

एखाद्या सहा वर्षाच्या मुलाला ॲनिमेशन आवडणे ही त्याची (त्याला ठाऊक नसली तरी) ॲनिमेटर म्हणून होणाऱ्या भावी प्रवासाची सुरुवात असते. ॲनिमेटेड कलाकृतीची गोष्ट त्याला कळली नाही तरी त्यातले संगीत, त्यातील भावाविष्कार त्याचे मन आकर्षित करून घेत असतो आणि म्हणूनच हे भावाविष्कार आपल्या ॲनिमेटेड पात्रांमध्ये उतरणे महत्त्वाचे असते.‌ खेळ चालू असताना खेळाडू आणि प्रेक्षक, उत्कटरित्या हे भावाविष्कार सतत आपल्या हालचालींमधून प्रकट करत असतात म्हणून खेळाच्या व्हिडिओ क्लिपचा अभ्यास ॲनिमेटरनी करणे गरजेचे आहे असे ख्रिसचे सांगणे होते. फक्त ॲनिमेशनमध्येच नव्हे तर चित्रे, साहित्य यामध्ये देखील व्यक्तीचित्रणे रंगवताना त्या भावाविष्कारांचा उपयोग होऊ शकतो हे त्यांनी पुढे सांगितले. 

Chris Kirshbaum At IFFI 2024
Aditya Jambhale At IFFI: '..मौजमजा म्‍हणजे गोवा नव्‍हे'; Article 370 च्या दिग्दर्शकाची गोमंतकीय चित्रपटसृष्टी, पर्यटनाबद्दलची परखड मते वाचा

‘ॲनिमेटरला स्वतः चांगला अभिनेता असण्याची गरज नाही. तुम्ही अशा खेळाच्या क्लिप पाहून, संदर्भ मिळवून किंवा तुमच्या मित्राला अभिनय करायला सांगून ॲनिमेशन मधील पात्रे रंगवू शकता’ हे सांगताना ‘आज एआयची (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हवा आणि चलती असली तरी माणूस हा निर्मितीच्या केंद्रस्थानी राहील असेच मला वाटते’ असेही ते पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com