Threat to kill Salman Khan: सिद्धु मुसेवालाच्या कुटूंबासह सलमान खानला ठार मारण्याची धमकी

अभिनेता सलमान खान आणि सिद्धू मुसेवालाच्या कुटूंबियांना ठार मारण्याची धमकी दिली आहे
Salman Khan 
Sidhu Moose Wala
Salman Khan Sidhu Moose WalaDainik Gomantak

Threat to Sidhu Moose Wala Parents and Salman Khan : दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबासह सलमान खानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे राजस्थानातून आलेल्या एका ईमेल द्वारे ही धमकी देण्यात आली आहे. सलमान खानला अशी धमकी देण्याची ही पहिली वेळ नाही.

सिद्धू मुसेवालाच्या आई- वडिलांना अशी धमकी मिळाली आहे राजस्थानातील अवघ्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने ही धमकी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. राजस्ठानमधील मानसा पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील चौकशी सुरु आहे.

धमकी देणाऱ्या ईमेलमध्ये अभिनेता सलमान खानचेही नाव असल्याचे अहवालात म्हटले आहे. यापूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांना एक पत्र आले होते, ज्यामध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तेव्हापासून सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीबाबत पोलिसांना माहिती असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धमकीचा ईमेल राजस्थानमधून पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप काहीही सांगितलेले नाही.

मुसेवालाच्या वडिलांना धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही अशीच धमकी ई-मेलद्वारे मिळाली होती. त्यानंतरही लॉरेन्स बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरिया यांच्याबद्दल काही बोलले तर ते त्यांना ठार मारतील, असे म्हटले होते.

त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. बलकौर सिंह यांनी प्रत्येक धमकीनंतर आपण घाबरत नसल्याचे सांगितले आहे.

Salman Khan 
Sidhu Moose Wala
Vivek Agnihotri : आधी कौतुक आणि आता स्पष्टीकरण, दीपिकावर केलेल्या त्या कमेंटने विवेक अग्नीहोत्री ट्रोल...

गेल्या वर्षी 29 मे रोजी सिद्धू मुसेवाला यांना पंजाबमधील मानसा येथे रस्त्यातच गोळी मारण्यात आली होती. मूसेवाला आपल्या मित्रासोबत जीपमध्ये बसून गावाकडे जात होता, तेव्हा रस्त्यात अनेकांनी त्याला घेरले आणि कारवर गोळीबार केला, ज्यामध्ये मूसेवालाचा मृत्यू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com