Shruti Hasan Nose Surgery: श्रुती हासनने दिली नाकावर सर्जरी केल्याची कबुली; म्हणाली...

तुटक्या नाकानेच केला पहिला चित्रपट; अधिक सुंदर दिसण्यासाठी अखेर उचलले सर्जरीचे पाऊल
Shruti Hasan
Shruti Hasan Dainik Gomantak
Published on
Updated on

Shruti Hasan Nose Surgery: अभिनेत्री श्रुती हासन नुकतीच तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत बिनधास्त व्यक्त झाली आहे. तिने नाकावर सर्जरी केल्याचेही खुलेपणाने मान्य केले आहे. अधिक सुंदर दिसायचे होते, त्यामुळे नाकावर सर्जरी केली.

Shruti Hasan
Bollywood News: अनारकलीच्या भूमिकेसाठी मधुबालाच्या आधी 'या' अभिनेत्रीला आली होती ऑफर

मी कशी दिसते, यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, याला मी फारसे महत्व देत नाही. आणि सर्जरीचे समर्थनही मी करत नाही. तथापि, माझे शरीर आहे, आणि ते मला जसे हवे तसे मी ठेवेन, असेही श्रुतीने ठामपणे सांगितले.

या मुलाखतीत श्रुती म्हणाली की, हे खरे आहे की, मी नोज जॉब करून घेतला होता. माझे नाक तुटले होते आणि विचित्र दिसू लागले होते. मी माझा पहिला चित्रपटही अशाच तुटक्या नाकाने केला होता. पण नंतर मी नाकावर सर्जरी करून घेतली कारण मला सुंदर दिसायचे होते. आणि जर मला माझा चेहरा सुंदर करून घ्यायचा असेल तर इतरांना अडचण होण्याचे कारणच काय? मी कशी दिसते किंवा कशी दिसत नाही, यावरून मला कुणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. माझे शरीर आहे आणि ते मी मला पाहिजे तसे ठेवेन.

Shruti Hasan
Aamir Khan's New Ad: आमिर खान, कियारा आडवाणीच्या नव्या जाहितीवरून वाद

श्रुती म्हणाली की, मला या सर्जरीसारख्या गोष्टींना प्रमोट करायचे नाही. पण जर कुणाला सर्जरी करायची असेल तर करू द्या. मला सुरवातीला सांगितले गेले होते की, मी हीरोईनसारखी दिसत नाही. लोक म्हणायचे की, मी परदेशी व्यक्तींसारखी दिसते. माझ्याकडे टॅलेंट आहे पण मी भारतीयांसारखी दिसत नाही. मग मी चित्रपट करण्यास सुरवात केली आणि एका चित्रपटात मला खेड्यातल्या मुलीची भूमिका मिळाली.

दरम्यान, श्रुतीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे तर आगामी काळात ती अभिनेता प्रभाससोबत 'सालार'या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय चिरंजीवीसोबतही ती आगामी चित्रपट करत आहे. श्रुती ही हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कार्यरत असून ती उत्तम गायिकाही आहे. श्रुती ही अभिनेता कमल हासन आणि अभिनेत्री सारिका यांची कन्या आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com