Himaira himu
Himaira himuDainik Gomantak

प्रसिद्ध अभिनेत्रीचा गूढ मृत्यू, संशयाची सुई प्रियकराकडे

प्रसिद्ध अभिनेत्री हुमैरा हिमुचं निधन झाल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.
Published on

Himaira himu dies at 36 : मनोरंजन विश्वातून नुकतीच एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री हुमैरा हिमुचं निधन झाल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. वयाच्या केवळ 37 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या या अभिनेत्रीचा गूढ मृत्यू झाला असुन याप्रकरणी तिच्या प्रियकरावर संशय व्यक्त केला जात आहे.

अंगावर मारहाणीच्या खुणा

News24Online ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 2 नोव्हेंबर रोजी हुमैराला उत्तरा मॉडर्न मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. इतकंच नाही, तर अॅक्टर्स इक्विटी असोसिएशनच्या अध्यक्षांनी सांगितलं की, तिच्या मानेवर मारहाण केल्याची खूण दिसल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना बोलावलं.

पोलिस येण्यापूर्वीच तिचा मित्र हॉस्पिटलमधून निघून गेला होता. त्यामुळे हुमैराच्या मित्रावर पोलिसांनी संशय व्यक्त करत असुन ते त्याचा शोध घेत आहेत.

एका तरुणासोबत प्रेमप्रकरण

पोलिसांनी दिलेल्या पुढील अहवालात म्हटले आहे की, अभिनेत्रीच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी आता पोस्टमॉर्टम केले जाईल. तसेच हुमैराचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते, असा दावा पोलिसांनी केला आहे.

2 नोव्हेंबर रोजी दुपारी दोघांमध्ये झालेल्या वादानंतर तिने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित करण्यापूर्वीच तिचा प्रियकर पळून गेल्याचा संशयही पोलिसांना आहे.

Himaira himu
अनेक चित्रपटांत महत्त्वाची भूमीका साकारणारी ही अभिनेत्री आता काठीशिवाय चालूही शकत नाही...

अमर बंधू रशीद चित्रपटातून पदार्पण

2006 मध्ये एका टेलिव्हिजन मालिकेद्वारे तिने हुमैराने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. याशिवाय हुमैराने 2011 मध्ये 'अमर बंधू रशीद' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.

'बारी बारी सारी सारी', 'हाऊसफुल', 'गुलशन एव्हेन्यू'सह अनेक टीव्ही नाटकांमध्ये हुमैरा झळकली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com