The Kerala Story Collection Day 7: केरळ स्टोरी जाणार 100 कोटींच्या क्लबमध्ये...दिग्दर्शकाचे ट्विट चर्चेत

'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने 7 व्या दिवशी चांगलीच कमाई केली आहे.
The Kerala Story Collection Day 7
The Kerala Story Collection Day 7Dainik Gomantak

वादग्रस्त ठरलेला आणि मनोरंजनापासुन राजकारणापर्यंत चर्चेत असलेला अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी' बॉक्स ऑफिसवर जोरदार व्यवसाय करत आहे. प्रत्येक दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ होत आहे. ५ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या सुदीप्तो सेन यांच्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाने चांगलाच वाद निर्माण केला होता.

पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी असताना, तामिळनाडूतील मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमध्येही या चित्रपटाला स्थान मिळाले नाही. मात्र, त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर अजिबात दिसला नाही. यावर चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी आता आपली जबाबदारी वाढली असल्याचं सांगितलं आहे. प्रेक्षकांचे आभार मानण्यासाठी त्यांनी ट्विट्टरवर एक पोस्ट लिहिली आहे.

सलमान खानच्या 'किसी का भाई, किसी की जान' आणि 'पोनीं सेल्वन-2' या सिनेमांनाही केरळ स्टोरीने धूळ चारून बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. एका आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे.

द केरळ स्टोरी रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. हा चित्रपट गेल्या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. केरळ स्टोरी 8 कोटींनी ओपन केली असेल पण दिवसेंदिवस चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होत आहे. कामाच्या दिवसांचाही चित्रपटावर काहीही परिणाम झाला नाही. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाने बुधवारी सुमारे १२ कोटींची कमाई केली, तर गुरुवारीही चित्रपटाचे कलेक्शन चांगलेच झाले.

या चित्रपटाने एकाच दिवशी जवळपास 12 कोटींची कमाई केली. चित्रपटाने आत्तापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 80.86 कोटींची कमाई केली आहे आणि वीकेंड संपण्यापूर्वी 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करू शकतो.

देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर, वादांमुळे 'द केरळ स्टोरी'ला कलेक्शनच्या बाबतीत फायदा झाला आहे, परंतु आता हा चित्रपट जगभरातही चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 81 कोटींचा व्यवसाय केला असून लवकरच हा चित्रपट जगभरात 100 कोटींचा आकडा पार करेल.

The Kerala Story Collection Day 7
Deepika -Ranveer Viral Video : इंटरव्यू सुरू असताना रणबीरने मध्येच दीपिकाच्या ओठांवर... यूजर्स म्हणाले

आता 'केरळ स्टोरी' हा चित्रपट उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये करमुक्त झाला आहे, आता हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होत आहे. 12 मे रोजी यूके आणि बेटांसह 37 ठिकाणी रिलीज होत आहे. कंगना रणौतपासून विवेक अग्निहोत्रीपर्यंत बॉलीवूडने 'द केरळ स्टोरी'वरील बंदीवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com