The Kerala Story Day 2 Box office Collection: दुसऱ्या दिवशी केरला स्टोरीने घेतली चांगलीच भरारी....केली इतकी कमाई...

द केरला स्टोरी या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली आहे.
The Kerala Story
The Kerala StoryDainik Gomantak
Published on
Updated on

The Kerala Story Day 2 Box office Collection: बहुचर्चित चित्रपट ' द केरळ स्टोरी ' शुक्रवारी, 5 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भारतात 8 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटात दुसऱ्या दिवशी चांगली वाढ झाली. 

मिड डे च्या वृत्तानुसार चित्रपटाने शुक्रवारी 8.03 कोटी रुपये आणि शनिवारी 11.22 कोटी रुपयांची कमाई केली. 

रिलीज होण्यापूर्वी, 'द केरळ स्टोरी'ला विरोध झाला, कारण अनेकांनी ट्रेलरमध्ये दावा केलेला आकडा अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे म्हटले होते.

चित्रपटाच्या टीझरमध्ये दावा करण्यात आला आहे की केरळमध्ये 32000 स्त्रिया जबरदस्तीने धर्म परिवर्तनाच्या बळी ठरल्या होत्या आणि बहुतेकांना ISIS मध्ये भरती करण्यात आले होते. 

कायदेशीर लढाईनंतर, निर्मात्यांनी 32000 महिलांचा दावा काढून टाकण्यास सहमती दर्शविली आणि चित्रपट राज्यातील तीन महिलांची कथा आहे हे असं सांगुन युट्यूबवरचा ट्रेलर एडिट केला.

शुक्रवारी, केरळ उच्च न्यायालयाने 5 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्यास नकार दिला होता. खंडपीठाने 'द केरळ स्टोरी'चा ट्रेलर देखील पाहिला आणि सांगितले की त्यात कोणत्याही विशिष्ट समुदायासाठी आक्षेपार्ह काहीही नाही.

 चित्रपटाला स्थगिती देण्यास नकार देताना न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की याचिकाकर्त्यांपैकी कोणीही चित्रपट पाहिला नाही आणि निर्मात्यांनी चित्रपट एक काल्पनिक आवृत्ती असल्याचे म्हटले आहे.

The Kerala Story
Parineeti - Raghav Chadha Love Story: परिणिता आणि राघव चढ्ढा पहिल्यांदा इथे भेटले आणि एकमेकांवर फिदा झाले...

"ही काल्पनिक गोष्ट आहे. भूत किंवा व्हॅम्पायर नाहीत, पण तेच दाखवणारे चित्रपट मोठ्या संख्येने आहेत." न्यायालयाने सुनावणीदरम्यान टिपणी केली. "असे अनेक चित्रपट आहेत ज्यात हिंदू संन्यासी तस्कर आणि बलात्कारी दाखवले आहेत. कोणी काही बोलत नाही. तुम्ही हिंदी आणि मल्याळम भाषेत असे चित्रपट पाहिले असतील.

केरळमध्ये आपण किती धर्मनिरपेक्ष आहोत. तिथे एक चित्रपट आला होता जिथे एक पुजारी मूर्तीवर थुंकतो. आणि कोणतीही समस्या निर्माण झाली नाही. तुम्ही कल्पना करू शकता का? हा एक प्रसिद्ध पुरस्कार विजेता चित्रपट आहे", न्यायमूर्ती नागरेश यांनी शुक्रवारी सकाळी सुनावणीदरम्यान असं सांगितलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com