Priyanka Chopra Deewali celebration
Priyanka Chopra Deewali celebrationDainik Gomantak

संपूर्ण जोनास कुटूंब रंगले दीपोत्सवात...प्रियांका चोप्राच्या सासरी दिवाळी थाटात

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या सासरी दिवाळीचा सण उत्साहात साजरा होताना दिसतोय.
Published on

Priyanka Chopra Deewali celebration : देशभरात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे प्रियांका चोप्रानेही परदेशात सेलिब्रेशन केले. त्यांनी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते, जिथे संपूर्ण जोनास कुटुंब पारंपारिक पोशाखांमध्ये दिसले होते.  

निकच्या मित्रांची हजेरी

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी लॉस एंजेलिसमध्ये दिवाळी पार्टी दिली. या पार्टीला मित्र आणि कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. 

संपूर्ण जोनास कुटुंब पारंपारिक पोशाखांमध्ये दिसले. निकचा भाऊ जो जोनासनेही निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. प्रियांकाच्या दिवाळी पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दिवाळी पार्टीचा जल्लोष

दिवाळी पार्टीत प्रियंका चोप्रा पती निक जोनासचा हात धरताना दिसली. या पार्टीत प्रियांका आणि निकचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. मात्र, काही लोकांना प्रियंका चोप्राचा आउटफिट आणि मेकअप अजिबात आवडला नाही.

Priyanka Chopra Deewali celebration
Priyanka Chopra Deewali celebrationDainik Gomantak

परिणितीच्या लग्नाला उपस्थित राहु शकली नाही

प्रियांका तिची बहीण परिणीतीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी भारतात येऊ शकली नाही. जो जोनास पार्टीत निळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान करताना दिसला. सध्या तो घटस्फोटामुळे चर्चेत आहे.

Priyanka Chopra Deewali celebration
कुडकुडत्या थंडीत शेहनाज गिलने घेतले बद्रीनाथचे दर्शन....व्हायरल फोटो

मुलीची रांगोळी

प्रियांका चोप्राने दिवाळीनिमित्त तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासने काढलेल्या रांगोळीचा फोटो शेअर केला आहे. गुलाबी रंगाच्या फुलांच्या नमुन्यात रांगोळी काढण्यात आली होती. मालतीची कलात्मकता रांगोळीत स्पष्ट दिसते.

आपली मुलगी मालतीचे असे टॅलेंट पाहून प्रियांकालाही आश्चर्य वाटले. तिने इन्स्टा स्टोरीवर रांगोळी शेअर करत लिहिले, 'पहिली रांगोळी'. यासोबत हात जोडून हृदयाचा इमोजीही बनवण्यात आला आहे.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com