अपूर्व.. अलौकिक.. एकमेव

या प्रभावी व्यक्तिमत्त्वांचे अंतरंग यशोधरा काटकर (Yashodhara Katkar) यांना ज्यातऱ्हेने आकळले ते त्यांनी आपल्या ‘अपूर्व, अलौकिक’ एकमेव’ या पुस्तकातून (Book) मांडले आहेत.
अपूर्व.. अलौकिक.. एकमेव
अपूर्व.. अलौकिक.. एकमेवDainik Gomantak
Published on
Updated on

यशोधरा काटकर (Yashodhara Katkar) या चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांच्या नात. मराठी नाट्य चित्रपट (Movie) सृष्टीतल्या अनेक मंडळींचा संपन्न सहवास त्यांच्या वाट्याला आला. त्या लिहितात, “डॉक्टर घाणेकर, प्रिया तेंडुलकर, प्रशांत-गौरी दामले ही मंडळी मला आयुष्याच्या अधल्या मधल्या, कुठल्या ना कुठल्या टप्प्यांवर अचानक भेटली आणि राही अनिल बर्वे यांची भेट तर अगदी अलीकडची! या प्रत्येक भेटीत आमच्यात संवाद झाला असे मात्र नाही. कधी अगदी सुंदर असे धागे जुळले, तर कधीकधी साधी ओळखही नसल्यासारखे पाठ फिरवून आम्ही आपापल्या वाटांनी निघून गेलो. पण कसे कुणास ठाऊक, कधी काही न मागतादेखील या सर्वांनीच आपापल्या परीने दुर्मिळ रत्नांसारखी काही मुल्ये माझ्या आयुष्याच्या पोतडीत अलगद ठेवून दिली आणि माझे आयुष्य संपन्न, समर्थ आणि चमकदार करून टाकले.

आणि आश्चर्याची गोष्ट अशी, की जेव्हा कधी पराकोटीची निराशा किंवा अत्युच्च आनंदाच्या क्षणी मी हे संचित उघडून बघते तेव्हा त्यात अनेक नव्या नजरबंदी करणाऱ्या देवदुर्लभ तेजस्वी रत्न स्फटिकांची भर पडलेली मला दिसते. कुणालाही कळू न देता कोणत्याही श्रेय व परतफेडीची अपेक्षा न करता कोण कधी चोरपावलाने येऊन माझ्यासाठी.... एकटीसाठी ठेवून गेले असेल? त्या चमकत्या रत्नांच्या प्रभेने सगळा आसमंत उजळून निघालेला बघून मी विस्मयचकित होऊन जाते. त्या चकित झालेल्या क्षणांच्या कहाण्या म्हणजेच माझे हे लेख”

अपूर्व.. अलौकिक.. एकमेव
गोव्याचे लघुपट झळकणार आज इफ्फीत...

या प्रभावी व्यक्तिमत्त्वांचे अंतरंग यशोधरा काटकर (Yashodhara Katkar) यांना ज्यातऱ्हेने आकळले ते त्यांनी आपल्या ‘अपूर्व, अलौकिक’ एकमेव’ या पुस्तकातून (Book) मांडले आहेत. त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे (Book) अनौपचारिक प्रकाशन (Publications) इफ्फी (IFFI) संकुलाच्या प्रेस रूममध्ये गोवा (Goa) मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई (Subhash Fhaldesai) यांच्या हस्ते होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com