Thalpathy Vijay : थलपती विजयच्या आगामी चित्रपटाच्या टायटलचे अनावरण

थलपती विजयच्या बहुचर्चित चित्रपटाच्या टायटलचे अनावरण झाले असुन त्याचं नाव घोषित करण्यात आलं आहे.
Thalpathy Vijay
Thalpathy VijayDainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिणेचे चित्रपट दर्जेदार असतातच पण त्याचबरोबर चित्रपटाचे टिजर किंवा पोस्टर बघणं हा सुद्धा एक विलक्षण अनुभव असतो. प्रत्येक बाबतीतली कलात्मकतेचा अनुभव म्हणजे दाक्षिणात्य चित्रपट असं म्हणता येईल.

सध्या थलापथी विजयचा बहुचर्चित आगामी चित्रपट त्याचे तात्पुरते टायटल 'थलापथी 67'असे ठेवण्यात आले होते, याचे ऑफिशल टायटल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आणि आता नुकतेच प्रेक्षकांची उत्सुकता लक्षात घेत, निर्मात्यांनी अखेरीस या चित्रपटाचे टायटल 'लिओ' असेल असे जाहीर केले आहे.

मेकर्सनी नेहमीच चित्रपटाशी संबंधित अपडेट्स प्रेक्षकांना दिले आहेत. दरम्यान, या सिनेमाच्या टायटलबद्दल दर्शकांची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच, निर्मात्यांनी या चित्रपटाचे टायटल 'लिओ' आहे अशी घोषणा केली आहे.

अशातच, निर्मात्यांनी सिनेमाचा एक जबरदस्त टायटल प्रोमो जारी केला आहे. या व्‍हिडिओमध्‍ये उत्तम बीजीएमसह (BGM) थलापथी विजयच्‍या काही ह्रदयस्पर्शी सीन्सची झलक पाहायला मिळेल. हा प्रोमो पाहून असे म्हणता येईल की 'लिओ'हा चित्रपट निश्चितपणे 7 स्क्रीन स्टुडिओचा आणखी एक मास्टर पीस असल्याची हमी देतो.

Thalpathy Vijay
Sidharth Malhotra-Kiara Advani: ठरलं! सिद्धार्थ-कियारा 'या' ठिकाणी घेणार सात फेरे...

थलापथी विजय सर, संजय दत्त आणि त्रिशा कृष्णन अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'लिओ'हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची दर्शकांची उत्सुकता वाढत आहे. अशातच, 7 स्क्रीन स्टुडिओच्या 'थलापथी 67'या चित्रपटाची निर्मिती एसएस ललित कुमार यांनी केली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज करणार आहेत. तसेच, या चित्रपटात थलापथी विजय सर, संजय दत्त आणि त्रिशा कृष्णन यांना पाहायला मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com