विजयच्या लिओचा बॉक्सऑफिसवर कल्ला...500 कोटींपासून चित्रपट फक्त काही अंतर दूर
Leo Box office collection : अभिनेता थलपती विजयने आपणच साऊथचा सुपरस्टार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या लिओ चित्रपटाने 500 कोटींच्या दिशेने वेगाने उड्डाण केले आहे. चला पाहुया या चित्रपटाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट
लिओचा धुमाकूळ
थलपती विजयच्या ' लिओ'चा पहिल्या आठवड्यातील कलेक्शनमुळे जगभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून उदयास आला आहे आणि या चित्रपटाने अनेक तमिळ चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत.
या चित्रपटाने रिलीजच्या दिवसापासून जगभरात 450 कोटींचा आकडा पार केला आहे. दररोज सरासरी 100 कोटींसह 4 दिवसांत 400 कोटी कमावल्यानंतर 'लिओ' भारत वगळता काही ठिकाणी सोमवारपासून थंडावला आहे.
लोकेश कनगराज दिग्दर्शित लिओ
लोकेश कनागराज दिग्दर्शित , विजय 'लिओ' मध्ये अनेक शेड्सचे पात्र साकारत आहे. सुपरस्टार विजयने त्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांना प्रभावित केले. विजयचा संपूर्णपणे हा दिग्दर्शकीय विलक्षण कल्पना मांडतो. चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे.
लिओ चित्रपटात त्रिशा, गौथम मेनन, संजय दत्त , मॅथ्यू थॉमस आणि सँडी त्यांच्या भूमिकांमध्ये चांगले चमकले, तर अनिरुद्ध रविचंदरने आपल्या संगीताच्या जादूने प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव दिला आहे.