दिया मिर्झा-आर माधवन यांच्या RHTDM ला 20 वर्षे, आजही चाहते प्रेमात

चित्रपटामधील गाणी आणि डायलॉग आज सुद्धा अनेकांच्या मनावर राज करत आहेत.
20 years of RHTDM
20 years of RHTDMDainik Gomantak
Published on
Updated on

अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) आणि आर माधवन (R. Madhavan) यांच्या "रहना है तेरे दिल में" (RHTDM) या चित्रपटाला अनेकांची पसंती मिळाली होती. या चित्रपटाला आज प्रदर्शित होऊन 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटामध्ये एक निरागस लव्ह स्टोरी (love Story) पाहायला मिळते. हा चित्रपट 19 ऑक्टोबर 2001मध्ये प्रदर्शित झाला होता. गौतम मेनेन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जास्त कमाई केली नसली तरी चित्रपटामधील गाणी (Song) आणि डायलॉग (Dialog) आज सुद्धा अनेकांच्या मनावर राज करत आहेत. पाहूया 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटमधील प्रसिद्ध डायलॉग

1) एक लाडकी देखी बिलकुल बिजली की तरह .. . एक फ्लॅश ... एक चमक और मैं अपना दिल खो बैठा

2) कुछ मुलाकाते यादे छोड जाती है और कुछ वादे

3) सच्चा प्यार कभी खाली हात वापस नही आता है

4) जाब किसी लडकी से प्यार हो जाता है ना ... तो दिल के चॅनल पर बस एक ही प्रोग्राम चलता है... जस्ट मोहब्बत

5) बस अब एक ही तमन्ना है... रेहना है उसके दिल मे

20 years of RHTDM
श्रीलंकन गायिका योहानीचं ब्लॉकबस्टर गाणं 'मानिके मगे हिथे' आता हिंदीत

दिया मिर्झाने तिच्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिली, माझ्या पदार्पणाला 20 वर्षे झाली! हा प्रवास खूप चांगला होता. मला आशा आहे की मी एक कलाकार म्हणून शिकत राहणार आणि पुढे जाणार. तुम्हा सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आणि टीम रेहना है तेरे दिल मे #20YeraOfRHTDMचे खूप आभार

आणि मॅडी उर्फ आर माधवनने देखील चित्रपटाबद्दल आपले प्रेम व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com