Kangana Ranaut
Kangana RanautDainik Gomantak

'तनू - मनू'ची भांडणं प्रेक्षकांना पुन्हा हसवणार? तनु वेड्स मनूचा तिसरा भाग लवकरच...

अभिनेत्री कंगना रणौतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तनू वेड्स मनू चित्रपटाचा भाग लवकरच येणार असल्याची माहिती दिली आहे.
Published on

Tanu weds Manu Part 3 : कंगना रणौतचा तेजस हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत असताना आता कंगनाने तिच्या चाहत्यांना आणखी एक खुशखबर दिली आहे. कंगना तिच्या गाजलेल्या चित्रपटाचा तिसरा भाग घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

तनु वेड्स मनू

आनंद राय दिग्दर्शित तनु वेड्स मनू या चित्रपटाने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं होतं. या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात अभिनेता आर माधवनने कंगनासोबत स्क्रीन शेअर केली होती. मिळालेल्या माहितीनुसार आता याच चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कंगनाने नुकतीच IMDB ला दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आगमी सिनेमाबाबत खुलासा केला आहे. कंगना आता आणखी तीन प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे ज्यात एक प्रोजक्ट एक विजय सेतुपतीसोबत आहे. हा एक थ्रिलर चित्रपटात असणार आहे.

विजय सेतूपतीही असणार

त्याचबरोबर ती 'तनू वेड्स मनु 3' मध्ये पुन्हा तनूच्या भुमिकेत परतणार आहे. IMDb शी बोलताना कंगनाला म्हणाली की, "मी विजय सेतुपती सरांसोबत एक थ्रिलर सुरू करत आहे, आणि नोटी बिनोदिनी नावाचा चित्रपट आहे.

तनु वेड्स मनू 3 हा तिचा दुसरा चित्रपट असणार आहे. याचाच अर्थ की कंगनाने तनु वेड्स मनू चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कंगनाचा चित्रपट लवकरच

आता कंगनाच्या या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये खुपच आनंद आहे. कंगनाच्या चाहत्यांना तिच्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. या चित्रपटाचे याआधी दोन भाग प्रदर्शित झाले आहेत, ज्यांना प्रेक्षकांचे खुप प्रेम मिळाले आहे. आता चाहते या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आनंद राय म्हणाले होते

एकीकडे कंगनाने या चित्रपटाची घोषणा केली आहे तर दुसरीकडे दिग्दर्शक आनंद एल राय यांनी यापुर्वी या चित्रपटाचा सिक्वेल न काढण्याबाबत वक्तव्य केले होते.

2015 च्या एका मुलाखतीत आनंद यांनी या चित्रपटाचा तिसरा भाग बनवणार नाही असे सांगितले होते. आता या वक्तव्यानंतर आनंद दिग्दर्शक म्हणून या चित्रपटात काम करणार की नाही याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. तर आर माधवन देखील या चित्रपटाचा भाग राहणार नाही अशा बातम्या यापुर्वी आल्या होत्या.

Kangana Ranaut
"दीपिकाचा अभिनय म्हणजे"...जवानचा दिग्दर्शक ॲटली म्हणाला

राष्ट्रीय पुरस्कार

तनु वेड्स मनु रिटर्न्ससाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता . आता तिचा तेजस हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्याला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com