तमिळ सुपरस्टार जोसफ विजय चंद्रशेखरने (Tamil superstar Vijay) न्यायालयात (court) धाव घेतली असून, त्याच्या नावाचा गैरवापर केल्याबद्दल पालकांसह इतरांविरोधात त्याने गुन्हा दाखल केला आहे. अभिनेता विजयने त्याचे नाव राजकीय हेतूंसाठी (political purposes) वापरल्याबद्दल त्याचे पालक, एस. चंद्रशेखर आणि शोभा शेखर यांच्यासह 11 जणांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
दिवाणी खटल्यात, त्याने त्याच्या पालकांसह 11 जाणांच्याविरुद्ध त्याच्या नावाचा वापर करून बैठका किंवा कार्यक्रम आयोजित करण्यास स्थगिती मागितली आहे. यापूर्वीच विजयने त्याच्या वडिलांनी नोंदणी केलेल्या 'विजय मक्कल मंद्राम' या सोसायटीच्या कार्यापासून स्वतःला दूर केले होते.
27 सप्टेंबर रोजी कोर्ट या प्रकरणाची सुनावणी घेण्याची शक्यता आहे. विजय मक्कल मंद्राम या सोसायटी कडून 6 ऑक्टोबर आणि 9 ऑक्टोबर रोजी नऊ तामिळनाडू जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या ग्रामीण स्थानिक राज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याची घोषणा करण्यात आली होती
या वर्षी जानेवारीत मद्रास उच्च न्यायालयात धाव घेताना, त्याच्या वकिलांनी सांगितले की विजयच्या वडिलांनी त्यांच्या संमतीशिवाय "अखिल भारतीय थालापथी विजय मक्कल मंद्राम" नावाच्या राजकीय पक्षाची नोंदणी केली आहे.
2021 च्या विधानसभा निवडणुकीत विजयचे वडील आणि अभिनेते दिग्दर्शक एस. चंद्रशेखर यांनी विजय फॅन्स असोसिएशनच्या नावाने राजकीय पक्ष काढला होता आणि निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मात्र, विजय आपल्या वडिलांच्या निर्णयाविरोधात उघडपणे आला असून आता त्याने निवडणूक लढविण्यास विरोध केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.