सलमान खानचा जीवन प्रवासच आता OTT वर

सलमानला (Salman Khan) हिंदी सिनेमाचा (Bollywood ) भाईजान (Bhaijan) म्हटले जाते. सलमानचे आयुष्य बऱ्याच मथळ्यांमध्ये आहे.
Salman Khan's all journey will be release on OTT
Salman Khan's all journey will be release on OTT Dainik Gomantak

सलमान खानने (Salman Khan) आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1988 पासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सलमान खानने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सलमानला हिंदी सिनेमाचा (Bollywood ) भाईजान (Bhaijan) म्हटले जाते. सलमानचे आयुष्य बऱ्याच मथळ्यांमध्ये आहे. कधी तो त्याच्या प्रोफेशनल लाईफ साठी तर कधी पर्सनल साठी हेडलाईन्स मध्ये राहिला आहे.(Salman Khan's all journey will be release on OTT)

सलमानच्या चाहत्यांसाठी आणखी एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे रिपोर्ट्सनुसार सलमानचा बॉलिवूडमधील संपूर्ण 3 दशकांचा प्रवास एका मालिकेत दाखवला जाईल. या मालिकेत सलमानचे कुटुंब, सहकलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि सहकाऱ्यांच्या मुलाखती होतील.

Salman Khan's all journey will be release on OTT
बॉलिवूडमधील या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शकच्या पत्नीनं घटवलं वजन; पाहा फोटो

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालिकेची तयारी सुरू झाली आहे आणि सलमान खान विज फिल्म्स आणि अप्लॉस एंटरटेनमेंटसह त्याची निर्मिती करणार आहे. चित्रपटाच्या टीमने OTT प्लॅटफॉर्मवर या मोठ्या प्रकल्पाबद्दल बोलणे सुरू केले आहे. मात्र हा चित्रपट कोणत्या व्यासपीठावर रिलीज केला जाईल याची अद्याप पुष्टी झालेली नाही. तसे, सलमान किंवा त्याच्या टीमकडून या बातमीबद्दल अद्याप कोणतीही पुष्टी नाही. पण जर असे झाले तर सलमानच्या चाहत्यांसाठी ही एक उत्तम मेजवानी असणार आहे.

सध्या सलमान टायगर 3 चे शूटिंग करत आहे. रशियानंतर सलमान तुर्कीमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत आहे. सलमानसोबत कतरिना कैफही आहे. दोन्ही कलाकार चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहेत. दोघांची चित्रे आणि व्हिडिओ देखील सेटवरून येत राहतात. काही दिवसांपूर्वी सलमानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात तो चाहत्यांसमोर 'एक बार जो जाए जवानी' या गाण्यावर नाचत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com