Tabu: खाकीनंतर आता स्पायच्या भूमिकेत दिसणार तब्बू! 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासोबत शेअर करणार स्क्रीन

Tabu as Spy: दोन चित्रपटांव्यतिरिक्त तब्बूने मेघना गुलजारच्या 2015 मध्ये विशालने लिहिलेल्या 'व्होडुनित'मध्येही काम केले आहे.
Tabu
TabuNETFLIX
Published on
Updated on

Tabu as Spy: तब्बू आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. ती ज्या चित्रपटात काम करते त्यातील भूमिकेला ती न्याय देते. आता तब्बू पोलिसाच्या भूमिकेतून स्पायच्या भूमिकेत दिसणार आहे.

लवकरच तब्बू आणि विशाल भारद्वाज यांची प्रमुख भूमिका असलेला 'खुफिया' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

खुफियाचा प्रोमो शेअर करताना नेटफ्लिक्स इंडियाच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'काही रहस्ये, ती गुप्तच राहिली तर बरे. पण हे नाही.

'खुफिया' हा तब्बू आणि विशालचा तिसरा चित्रपट आहे. २००३ मध्ये 'मकबूल' आणि २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला हैदर हा चित्रपटात देखील एकत्र दिसले होते. हे दोन्ही चित्रपट विल्यम शेक्सपियरच्या मॅकबेथ आणि हॅम्लेट या कथांवर आधारित होते.

विशालच्या दोन चित्रपटांव्यतिरिक्त तब्बूने मेघना गुलजारच्या 2015 मध्ये विशालने लिहिलेल्या 'व्होडुनित'मध्येही काम केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, ती विशालचा मुलगा आस्मान भारद्वाजच्या 'कुत्ते' मध्ये देखील होती.

गेल्या वर्षी 'खुफिया'च्या टीझर लाँचच्या वेळी विशालला विचारण्यात आले की, तब्बूसोबतच्या त्याच्या सिझलिंग ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचे रहस्य काय आहे, तेव्हा त्याने उत्तर दिले होते की हे प्रेम आहे, त्यामुळे त्यांचे एकत्र चित्रपट हिट होताना दिसतात.

Tabu
Dhadkan: लवकरच येणार 'धडकन'चा सिक्वेल! अंजलीच्या आयुष्यात परतणार का देव?

खुफिया हा चित्रपट निओ-नॉयर हेरगिरी थ्रिलर अमर भूषण यांच्या 'एस्केप टू नोव्हेअर' या कादंबरीवर आधारित आहे. यात अली फजल, वामिका गब्बी आणि आशिष विद्यार्थी यांच्याही भूमिका आहेत.

यापैकी वामिकाने गेल्या वर्षी प्राइम व्हिडिओ इंडियाच्या 'मॉडर्न लव्ह मुंबई'मध्ये विशालसोबत आणि या वर्षाच्या सुरुवातीला 'फुर्सत' या चित्रपटात ईशान खट्टरसोबत काम केले आहे.

तब्बू आणि विशाल भारद्वाज ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट ऑन-स्क्रीन जोडी आहे. त्याचा हा चित्रपट 'खुफिया' हा एक स्पाय थ्रिलर आहे, जो 5 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्स इंडियावर प्रदर्शित होणार आहे.

नेटफ्लिक्स इंडियाने गुरुवारी इंस्टाग्रामवर स्पाय थ्रिलरच्या रिलीज तारखेची घोषणा करत प्रोमो पोस्ट केला आहे. आता विशाल आणि तब्बूची जोडी पून्हा एकदा कमाल करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तिचे चाहते या चित्रपटाची वाट आतुरतेने वाट पाहत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com