Dhadkan: लवकरच येणार 'धडकन'चा सिक्वेल! अंजलीच्या आयुष्यात परतणार का देव?

Dhadkan Sequel: पहिल्या भागाबद्दलही मला खात्री नव्हती असे दिग्दर्शकाने मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.
Dhadkan Sequel
Dhadkan SequelDainik Gomantak
Published on
Updated on

Dhadkan Sequel: बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे आहेत ज्यांची आजही जादू चालताना दिसते. सध्या गदर २ ने देखील बॉक्स ऑफीसवर धुमाकुळ घातला आहे.

आता भूल भुलैया 2', 'गदर 2' आणि OMG 2 च्या यशानंतर निर्माते सिक्वेलवर वेगाने काम करत आहेत.

अलीकडेच सुभाष घई यांनीही 'खलनायक 2' बनवण्याबाबत बोलले होते. आता अशा परिस्थितीत आणखी एका सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा रंगली आहे. हा चित्रपट शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांच्या 'धडकन' चित्रपटाची आहे.

दिग्दर्शक धर्मेशने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'धडकन 2' बद्दल वक्तव्य केले आहे. 'मला 'धडकन 2'ची ऑफर आली आहे. 'धडकन'चे निर्माते रतन जैन दशकभरापासून माझ्याशी संपर्क साधत आहेत.

माझ्या मते हा एक क्लासिक चित्रपट आहे. गदर २ च्या यशानंतर मला पुन्हा चित्रपट बनवण्यास सांगितले जात आहे.'

दरम्यान, 'धडकन 2' बनवण्यासाठी त्याने निर्मात्यांसमोर आपल्या अटी ठेवल्याचेही धर्मेशने म्हटले आहे. तो म्हणाला, 'मी निर्मात्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, कोणत्याही बाबतीत तडजोड केली नाही तरच मी चित्रपट बनवणार आहे.

मला माहित नाही की तो किती मोठा हिट होईल. पहिल्या भागाबद्दलही मला खात्री नव्हती असे दिग्दर्शकाने मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

Dhadkan Sequel
Ayushmann Khurrana: 'या' चित्रपटांसाठी ओळखला जातो आयुषमान खुराना

२००० साली रिलिज झालेला धडकन हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार आणि सुनिल शेट्टी यांनी या चित्रपटात अप्रतिम काम केले होते.

आता धडकन चा सिक्वेस आला तर हेच कलाकार पून्हा दिसणार का ? अंजली देव यांची कहाणीला कोणते वळण मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com