बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करबद्दल ट्रोलर्स पुन्हा एकदा सोशल मीडियावर गलिच्छ बोलत आहेत. फेक मीडिया पोर्टल बनून काही ट्रोलर्सनी स्वरा भास्करच्या गरोदरपणाची बातमी पसरवली, त्यानंतर लोकांनी अभिनेत्रीला ट्रोल करायला सुरुवात केली.
या बनावट स्क्रीनशॉटमध्ये स्वरा भास्कर जुलैमध्ये मुलाला जन्म देऊ शकते, असे लिहिले होते. पण नंतर त्या न्यूज पोर्टलने अधिकृत ट्विट करून संपूर्ण सत्य सांगितले. वृत्तवाहिनीने सांगितले की, ही फेक न्यूज आहे. त्यांच्या नावाने या खोट्या बातम्या चालवल्या जात आहेत. तर स्वरा भास्करने या वृत्तांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका न्यूज पोर्टलने ही बातमी दिली होती ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, 'बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर प्रेग्नंट झाली, पती फवाद अहमदने स्वतः याची पुष्टी केली आहे. अभिनेत्रीची प्रसूती जुलै महिन्यात होऊ शकते. या नायिकेने फेब्रुवारीमध्येच ८ वर्षांनी लहान फवादशी लग्न केले
आता ज्या पोर्टलच्या नावाने ही फेक न्यूज चालवली जात होती, त्याच वृत्तवाहिनीने ट्विटरवर अधिकृत पोस्ट केली आहे. त्यांनी हे वृत्त खोटे आणि मूर्खपणाचे असल्याचे स्पष्ट केले. अधिकृत न्यूज पोर्टलने ट्विट केले की, 'अभिनेत्री स्वरा भास्करशी संबंधित हे बनावट ट्विट न्यूज 24 च्या नावाने सोशल मीडियावर शेअर केले जात आहे, जे पूर्णपणे बनावट आहे. आम्ही असे कोणतेही ट्विट केलेले नाही.
स्वरा भास्कर अनेकदा तिच्या राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत असते, पण आता तिच्या व्यक्तीगत आयुष्यात 'पॉलीटिकल एन्ट्री' झाली. स्वरा भास्करने (Swara Bhaskar) समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले.
स्वरा या वर्षाच्या सुरुवातीला 6 जानेवारीलाच विवाहबद्ध झाली होती. काही दिवसांपूर्वी स्वराने स्वतःचा आणि फहादचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, पण या फोटोत दोघांचेही चेहरे दिसत नव्हते. पण आता स्वराने जानेवारीत झालेल्या लग्नाची घोषणा केली आहे. स्वराचे पती फहाद अहमद हे समाजवादी पक्षाचे नेते आहेत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.