ट्विटर हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे लोक त्यांची मतं मोकळेपणाने मांडत असतात, कित्येकदा सेलिब्रिटींना ट्रोल केलं जातं आता या ट्रोलिंगचा सामना अभिनेत्री स्वरा भास्करला करावा लागला आहे . ट्विट्टरवर युजर्स त्यांची मतं शेअर करत असतात. येथे बऱ्याचदा वेगवेगळ्या विचारांमुळे वाद होतात.
एखाद्याशी सहमत होऊ शकता आणि असहमत देखील असू शकता. पण आता हा प्लॅटफॉर्म ट्रोलिंगसाठी अधिक प्रसिद्ध झाला आहे. चर्चा कमी आणि लोकांचे वादच जास्त अशी स्थिती सध्या दिसत आहे. अभिनेत्री स्वरा भास्करच्या लग्नाची बातमी आली आणि ट्रोलर्स सक्रीय झाले. स्वराने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांच्याशी लग्न करताच ट्रोलिंगला जोरदार सुरूवात झाली आहे.
बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करच्या लग्नाची बातमी या यूजर्सनी वाचताच विचित्र पद्धतीने ट्रोल करत आहेत. कित्येकांनी स्वराने मुस्लिम तरुणाशी लग्न केले म्हणुन तिच्यावर कमेंट्स केल्या आहेत. काहीजणांनी ती हिंदू विरोधात असल्याच्या कमेंटस केल्या आहेत.
काहीजणांनी तिच्या जुन्या ट्विट्टरचा संदर्भ देत कमेंटस केल्या आहेत . त्याने अभिनेत्रीचा पती फहाद अहमदला विचारणा केली. ट्रोलर्सनी स्वराला धर्मविरोधी ठरवून तिच्यावर टीकाही केली आहे.
काहींनी तर मीम्स तयार करुन स्वराच्या लग्नाची खिल्ली उडवली आहे. एका युजरने मीमद्वारे स्वराचे वडील म्हणतील 'गेली एकदाची पीडा' अशी टिप्पणी केली आहे. स्वरा भास्कर आपल्या निर्भिड स्वभावामुळे प्रसिद्ध आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.