शाहरुख खानचा स्वदेस चित्रपटात ग्रामीण भागातल्या शिक्षिकेचं काम केलेली अभिनेत्री गायत्री जोशी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. 2 ऑक्टोबर रोजी इटलीत गायत्री जोशीचा तिच्या पतीसह झालेल्या अपघातात एका स्वीस जोडप्याचा मृत्यू झाला आहे.
या अपघाताची सध्या चौकशी सुरू झाली असुन त्यात दोषी आढळल्यास गायत्री जोशीचे पती विकाक ओबेरॉयच्या अडचणी वाढू शकतात अशी माहिती आता मिळाली आहे.
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या भीषण अपघाताची छायाचित्रे आणि फुटेज पोलिसांनी जप्त केले आहेत. यात स्पोर्ट्स सुपरकार आणि कॅम्पर व्हॅनचाही समावेश आहे.
निळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी आणि लाल फेरारी यांच्यात झालेली ही भयंकर अपघाताची घटना इटलीतल्या सॅन जिओव्हानी सर्गीउ शहराजवळील रोड क्रमांक 195 वर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, इटालियन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गायत्री जोशी आणि तिचे पती विकास ओबेरॉय यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. विकास दोषी आढळल्यास त्यांना 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, असे वृत्त आहे.
गायत्री जोशी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे चित्र अपघाताच्या दिवसाचे आहे. जिथे अभिनेत्री पूर्णपणे स्तब्ध दिसते. ती रस्त्यावर बसून अपघातानंतर चक्काचूर झालेल्या कारकडे पाहत होती.
अपघात झाला तेव्हा गायत्री जोशीचे पती विकास ओबेरॉय लॅम्बोर्गिनी हुराकन चालवत होते, ज्याची किंमत भारतात सुमारे 4 कोटी रुपये आहे, तर स्विस जोडपे, मार्कस क्रौटली आणि त्यांची पत्नी मेलिसा फेरारीमध्ये होते. त्या वेळी, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे, दुभाजक नसलेल्या महामार्गावर अनेक स्पोर्ट्स कार वेगाने जात होत्या.
या अपघातात दोषी आढळल्यास विकास ओबेरॉयवर इटालियन कायद्यांतर्गत आरोप लावले जातील आणि हे चालू तपासाच्या निकालाशी जोडले जाईल का? भारतातील सर्वात श्रीमंत टायकूनपैकी एक, ओबेरॉय हे रियल्टी कंपनीचे अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक आहेत, जे मुंबईच्या पश्चिम उपनगरात अनेक लक्झरी प्रकल्पांमध्ये गुंतलेले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.