क्रूर भाव दाखवणारा संजय दत्त आणि थंड डोक्याचा विजय... लिओचा धडकी भरवणारा ट्रेलर रिलीज...

साऊथच्या बहुचर्चित लिओ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असुन ट्रेलर पाहुन एकंदरित चित्रपटाच्या कथेचा अंदाज येत आहे.
Leo Trailer
Leo TrailerDainik Gomantak
Published on
Updated on

Leo Trailer : गेले काही दिवस साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीसह देशभरात सुपरस्टार थलपती विजयच्या लिओ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात विजयसह अभिनेता संजय दत्तचीही मुख्य भूमीका असुन चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

या ट्रेलरमध्ये संजय दत्त विलक्षण क्रूर भाव दाखवतोय तर सुपरस्टार विजय शांत डोक्याने काम करताना दिसतोय चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटातली अॅक्शन

लोकेश कनागराज दिग्दर्शित लिओ, थलपथी विजय मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आहे. ट्रेलर पूर्णपणे अॅक्शनने भरलेला आहे. थलपथी विजय संजय दत्तसोबतची अॅक्शनही चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 

दोन मिनिटे आणि 43 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये थलपथी विजयचे पात्र लिओ दास सामान्य जीवन जगत आहे, जे खूप शांत आहे.

लिओ कोण आहे?

लिओ दास हा कौटुंबिक माणूस आहे. त्याला पत्नी आणि एक मुलगी आहे, ज्यांच्यासोबत तो काश्मीरमध्ये राहतो. पण त्याचा भूतकाळ अजूनही त्याला सतावत आहे. त्याच्या आयुष्यातील खलनायक त्याचा माग काढतात. त्यांनी त्याचे कपडे जाळले आणि त्याला बेदम मारहाण केली. काही क्षणांसाठी लिओ खूप असहाय्य दिसत आहे. 

पण पुढच्याच क्षणी लिओ दासचा असाच भितीदायक अवतार पाहायला मिळतो, जो हसू देतो. तो एकटाच सगळ्या गुंडांना मारतो. ट्रेलरच्या शेवटी संजय दत्त दिसतो. या चित्रपटात तो एक भयानक खलनायक बनला आहे.

लिओ मूळ तमिळ भाषेत

'लिओ' 19 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. हा चित्रपट मूळ तमिळ भाषेत बनवला आहे, आणि तेलुगू आणि हिंदी भाषांमध्येही रिलीज होणार आहे. थलपथी विजय आणि संजय दत्त व्यतिरिक्त या चित्रपटात त्रिशा कृष्णन, प्रिया आनंद, गौतम वासुदेव मेनन आणि मन्सूर अली खान यांच्यासह अनेक कलाकार आहेत.

लिओच्या स्क्रिनींगवेळी चाहत्यांचा राडा

दुसरीकडे, चेन्नईच्या रोहिणी थिएटर्समध्ये 'लिओ'च्या ट्रेलरच्या स्क्रिनिंगदरम्यान थलपथी विजयच्या चाहत्यांचे नियंत्रण सुटले आणि त्यांनी कहर केला. चाहत्यांच्या या कृत्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांच्या या कृतीवर नेटिझन्स संतप्त झाले आणि त्यांनी त्याचा निषेध केला. थलपथी विजय आता यावर काय बोलतात हे पाहायचे आहे.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com