बॉलीवुड अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स 1994 सुष्मिता सेनची (Sushmita Sen) इंग्लिश भाषेवरील प्रभुत्व पाहून वाटणार नाही की ती हिंदी मिडियमधून शिक्षण घेतले आहे. एका मॅगझिन दिलेल्या मुलाखतीमध्ये (Interview) तिने खुलासा केला आहे. तिने सांगितले की ती हिंदी माध्यमातून शिक्षण घेतले आहे. मिस युनिव्हर्सच्या वेळी जेव्हा तिला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने कुप सुंदर उत्तर दिले.
मिस युनिव्हर्सच्या अंतिम फेरीत हा प्रश्न विचारला होता
सुष्मिताला (Sushmita Sen) अंतिम फेरीत विचारण्यात आले होते की "तुला स्त्री असण्याचा अर्थ काय? यावर सुष्मिताने उत्तर दिले - स्त्री असणे ही देवाने दिलेली सुंदर गिफ्ट आहे ज्याचे आपण कौतुक केले पाहिजे. एका मूलाला जन्म देणारी आई असते. स्त्री एका माणसाला काळजी घेणे, प्रेम करायला शिकवते. हेच स्त्री असण्याचे सार आहे.मिस युनिव्हर्समध्ये प्रश्न विचारला जात असताना तीच्या मनात काय चालले होते हे सुष्मिताने एका मुलाखतीमध्ये सांगितले. तिची मुलगी अलिशा तीच्या एका शालेय मॅगझिनसोबत बोलताना म्हणाली- "मला त्या प्रश्न-उत्तरात आवडले ते म्हणजे त्यांनी कधीच महिलांमधील गुण विचारले नाही, त्यांनी महिला असण्याचा अर्थ काय हे विचारले होते.
माझे हिंदी मिडियममधून शिक्षण झाले असेल तरी मला त्यांचे प्रश्न समजले होते असे सुष्मिता म्हणाली. ती पुढे म्हणाली मला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देताना देव माझ्या पाठीशी होते.ती पुढे म्हणाली, स्त्री केवळ आई होण्यासाठी जन्माला आलेली नाही तर ती जगाला प्रेम करायला , काळजी घ्यायला आणि दुख: वाटून घेणे शिकवायला आली आहे.ज्या पद्धतीने आपण आपल्या मुलांना वाढवतो हे आपले सार आहे. हेच माझे संपूर्ण उत्तर होते. मी देवाला म्हणते, स्त्री असण खरच खूप शक्तिशाली आहे. स्त्रीने फक्त दुसऱ्याचा विचार करतांना, स्वत:च्या आत दडलेल्या व्यक्तीला सुद्धा ओळखायला हवे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.