वाह उस्ताद! झाकीर हुसेन यांनी इटालियन नृत्यांगनेशी बांधलीय लग्नगाठ

वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी अमेरिकेत त्यांचा पहिला कॉन्सर्ट सादर केला आणि 1973 मध्ये त्यांचा पहिला अल्बम 'लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड' लाँच केला.
Zakir Hussain and Antonia Minnecola story News |Zakir Hussain news
Zakir Hussain and Antonia Minnecola story News |Zakir Hussain newsTwitter
Published on
Updated on

झाकीर हुसेन (Zakir Hussain) यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. हुसेन आपल्या बोटांनी तबल्या जो ताल तयार करतात त्या तालामध्ये अख्ख्या जगातील लोक रंगून जातात. त्या सर्व रसिक प्रेक्षकांनी हूसेन यांनी सादर केलेल्या तबल्यावरील तालाची समाधी लागते. म्हणून त्यांना 'उस्ताद' झाकीर हुसेन म्हणतात. झाकीर हुसैन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत (Mumbai) झाला. हे कौशल्य त्यांना त्यांचे वडील अल्ला रख खान यांच्याकडून मिळाले आहे, जे स्वत: प्रसिद्ध तबलावादक होते. आज आम्‍ही तुम्‍हाला जागतिक स्‍तरावर आपली कला सिद्ध करणा-या झाकीर हुसेनबद्दल सांगणार आहोत. (Zakir Hussain and Antonia Minnecola)

झाकीर हुसेन यांनी वयाच्या अवघ्या तीसऱ्या वर्षी वडिलांकडून पखावज वाजवायचे शिक्षण घेतले. त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण घेतले. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी अमेरिकेत त्यांचा पहिला कॉन्सर्ट सादर केला आणि 1973 मध्ये त्यांचा पहिला अल्बम 'लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड' लाँच केला. त्यांच्या या अल्बमला लोकांनी खूप मोठ केलं.

Zakir Hussain and Antonia Minnecola story News |Zakir Hussain news
शंकर महादेवन संगीतकार नसते तर उत्तम शेफ झाले असते

हुसेन हे भारतात तसेच जगातही खूप प्रसिद्ध तबलावादक आहेत. ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलेले ते पहिले भारतीय संगीतकार होते. त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. त्याच वेळी त्यांना 1992 मध्ये 'द प्लॅनेट ड्रम' आणि 2009 मध्ये 'ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट'साठी संगीताच्या जगातील सर्वात मोठा ग्रॅमी पुरस्कार दोनदा मिळाला आहे.

यासोबतच त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांसह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हुसेन यांना केवळ तबला वाजवण्यातच रस नव्हता, तर त्यांना अभिनयाचीही आवड होती. 1983 मध्ये झाकीर हुसेन यांनी 'हीट अँड डस्ट' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर त्यांनी 1988 मध्ये 'द परफेक्ट मर्डर', 1992 मध्ये 'मिस बॅटीज चिल्ड्रन' आणि 1998 मध्ये 'साज' या चित्रपटात अभिनयात आपले नशिब आजमावले.

Zakir Hussain and Antonia Minnecola story News |Zakir Hussain news
आमिर खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपटातील इशान बघा कसा दिसतोय

झाकीर हुसेन यांनी 1978 मध्ये कथ्थक नृत्यांगना अँटोनिया मिनिकोलाशी (Antonia Minnecola) विवाह केला. ती इटालियन होती आणि त्याची मॅनेजर होती. त्यांना अनिसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी या दोन मुली आहेत. झाकीर हुसेन हे बिल लॉसवेस यांच्या जागतिक संगीत सुपरग्रुप 'तबला बीट सायन्स' चे संस्थापक सदस्य देखील आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com