Jai Bhim: सूर्याच्या अडचणीत वाढ, हल्ल्याच्या धमकीनंतर घराबाहेर पोलिस बंदोबस्त

साउथ सिनेसृष्टीतील (South movie) प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेता सुर्या (Suriya) सध्या अडचणींचा सामना करत आहे.
Suriya got into trouble for Jai Bhim movie
Suriya got into trouble for Jai Bhim movie Dainik Gomantak

साउथ सिनेसृष्टीतील (South movie) प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेता सुर्या (Suriya) सध्या अडचणींचा सामना करत आहे. अलीकडेच त्याचा जय भीम हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म ऍमेझॉन प्राइम व्हिडिओ वर प्रदर्शित झाला. या कोर्ट ड्रामा चित्रपटात सुर्याने वकील चंद्रूची भूमिका साकारली होती. जय भीम (Jai Bhim) हा चित्रपट जातीच्या आधारावर होत असलेल्या भेदभावावर भाष्य करतो. या चित्रपटाविरोधात वन्नियार समाज सातत्याने आंदोलन करत आहे.

त्यामुळे आता अभिनेता सूर्याच्या घरी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, वन्नियार संगमच्या प्रदेशाध्यक्षांनी चित्रपटाचा जय भीम अभिनेता सुर्या, अभिनेत्री ज्योतिका, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि चित्रपटाचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी चित्रपटातील सर्व कलाकार आणि निर्मात्यांनी वन्नियार समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

Suriya got into trouble for Jai Bhim movie
लसीकरणासाठी आता भाईजान सरसावला

वन्नियार संगमच्या कायदेशीर नोटीसनंतर सूर्याच्या घरावर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एवढेच नाही तर अभिनेत्याला वेगवेगळ्या धमक्याही मिळत आहेत. विशेष म्हणजे जय भीम या चित्रपटात आदिवासी इरुलर समाजातील लोकांना पोलीस कोठडीत घेऊन अत्याचार करताना दाखवण्यात आले आहे. वन्नियार समुदायाने या दृश्यावर आपला आक्षेप व्यक्त केला आहे आणि चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकारांना जाहीर माफी मागण्यास सांगितले आहे.

इतकंच नाही तर समाजाचा अपमान केल्याबद्दल वन्नियार संगमने अभिनेते आणि निर्मात्यांकडून माफी मागितल्याशिवाय 5 कोटी रुपयांची मागणी केली आहे. नोटीसनंतर वन्नियार समाजाच्या सदस्यांनी सूर्याला उघडपणे धमकावले. पट्टाली मक्कल काची (पीएमके) नागापट्टिनमचे जिल्हा सचिव, सीतामल्ली पझानी सामी यांनीही अभिनेत्यावर हल्ला करणाऱ्यांना एक लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. आम्ही तुम्हाला सांगतो की 'जय भीम' हा चित्रपट 2 नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ ओटीटी वर रिलीज झाला आहे.

रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. याआधी प्रकाश राज यांना चित्रपटातील एका दृश्यात हिंदीत बोलल्याबद्दल एका व्यक्तीला कानाखाली मारल्याबद्दल टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर एका मुलाखतीत प्रकाश राज यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. ते म्हणाले, 'एखाद्या व्यक्तीला स्थानिक भाषा माहीत असूनही तो हिंदीत बोलून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. त्यावर समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय असेल, हे तिथे दाखवण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com