Sunny Deol : म्हणून 'सनी देओल' लोकसभेची निवडणूक लढणार

अभिनेता सनी देओल 2024 च्या लोकसभेची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
Sunny Deol
Sunny DeolDainik Gomantak

अभिनेता सनी देओलचा गदर 2 ची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाने 500 कोटींची कमाई केली असताना आता सनी देओलने एक मोठा निर्णय घेतला.

लोकसभेचे सदस्य असणारा तारासिंह म्हणजेच सनी देओल आता आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार नाही.

लोकसभेतील कमी उपस्थिती

संसदेतल्या कमी उपस्थितीबद्दल विचारले असता, सनीने उत्तर दिले, “माझी उपस्थिती खरोखर कमी आहे आणि ती चांगली गोष्ट आहे असे मी म्हणत नाही, परंतु जेव्हा मी राजकारणात आलो तेव्हा मला समजले की हे माझे जग नाही. होय, परंतु मी माझ्या मतदारसंघासाठी काम करत आहे आणि करत राहीन. 

संसदेत जावो किंवा न जावो

संसदेतल्या उपस्थितीवर उत्तर देताना सनी म्हणाला "मी संसदेत जावो किंवा न जावो याने काही फरक पडत नाही, माझ्या मतदारसंघातील कामावर त्याचा परिणाम होणार नाही. याशिवाय संसदेत गेल्यावर मला अडचणींचा सामना करावा लागतो. आणि नंतरच्या काळात तर कोविड होता". 

अभिनय आणि राजकारण

अभिनेता म्हणून तुम्ही कुठेही गेलात तरी लोक तुम्हाला घेरतात. माझ्या मतदारसंघासाठी मी केलेल्या कामांची यादी माझ्याकडे आहे, पण माझ्या कामाची प्रसिद्धी करणारा मी नाही. जिथपर्यंच राजकारणाचा संबंध आहे,तर मी हे सांगतो हा एक असा व्यवसाय आहे ज्यात मी बसत नाही.

मोदींजींना माहित आहे

2024 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारीबद्दल बोलताना सनी म्हणाला, “मला आता निवडणूक लढवायची नाही.” पंतप्रधान मोदींनी त्यांना निवडणूक लढवण्यास सांगितले तर ते तयार होतील का? असा प्रश्नही सनी देओलला विचारला. 

यावर अभिनेता म्हणाला, "मोदीजींनाही माहीत आहे की, हा मुलगा सनी आपल्या चित्रपटातून देशाची सेवा करत आहे, त्यामुळे त्याने असेच करत राहावे."

Sunny Deol
माय नेम इज खान, वर्थ, द रिपोर्ट..9/11 च्या काळ्या दिवसावर भाष्य करणारे हे चित्रपट पाहाच

गदर 2 ची कमाई

सनी देओलच्या गदर 2 ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 500 कोटींची कमाई करून जबरदस्त यश मिळवले आहे. तो फक्त शाहरुख खानच्या पठाणच्या मागे आहे. अलीकडेच त्याने प्रभासच्या बाहुबली 2 : द कन्क्लूजनच्या हिंदी आवृत्तीच्या आजीवन संग्रहाला मागे टाकले आहे.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com