Suhana Khan in Goa : सुहाना खानची मित्रांसोबत गोव्यात धमाल, इन्स्टाग्रामवर फोटो केले शेअर

शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खानने गोव्यातले आपल्या मित्रांसोबतचे काही फोटो नुकतेच सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.
Suhana Khan in Goa
Suhana Khan in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

अभिनेता शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना गोव्याच्या सुट्टीवर होती. गोव्याच्या या सुट्टीतले काही सुंदर फोटोही तिने आपल्या फॅन्ससोबत शेअर केले आहेत. सुहाना खानने तिच्या गोव्यात सुट्टी साजरी करताना फोटो पोस्ट केले आहेत. फोटो डंपमध्ये स्टायलिश फिट्समध्ये जबरदस्त आकर्षक दिसणारी आणि तिच्या मित्रांसोबत आनंद लुटणारी सुहाना चांगलीच धमाल करताना दिसत आहे.

सुहानाने शेअर केले फोटो

शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खान तिच्या मित्रांसह गोव्याला गेली होती. ती तिच्या सुट्टीवरून परतली असली तरी, ही स्टार किड अजूनही धमाल करण्याच्या मनःस्थितीत आहे. तिथल्या सुट्टीचे फोटो शेअर करण्यासाठी तिने इंस्टाग्रामवर आपले फोटो शेअर केले आहेत.

मित्रांसोबत सेल्फी

सुहानाच्या पोस्टमध्ये, आलिया छिबा आणि त्यांच्या मैत्रिणीसोबतचा सेल्फी दिसतो. यात हे त्रिकूट एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले दाखवले आहे. सुहानाने आउटिंगसाठी प्रिंटेड स्पेगेटी-स्ट्रॅप ड्रेस परिधान केला होता. तिन, नो-मेकअप लुकसह चाहत्यांना आपण पूर्ण धमाल करण्याच्या मूडमध्ये आहोत हे दाखवून दिले.

सुहानाचे आऊटफिट्स

फोटोंमध्ये राखाडी क्रॉप टॉप आणि हलक्या निळ्या रंगाच्या डेनिम जीन्समध्य सुहाना एका सुंदर उन्हात बाहेर फिरताना दिसत आहे. स्लीव्हलेस ब्लाउजमध्ये गोलाकार नेकलाइन, रिब्ड डिझाइन, फिट सिल्हूट आणि एक लहान हेम आहे जे तिच्या टोन्ड मिड्रिफला प्रकट करते. तिने टिंटेड सनग्लासेस, सुंदर हेअरस्टाइल, सोन्याचे हुप कानातले, आणि लुई व्हिटॉन मोनोग्राम पॅटर्नसह साखळीने बांधलेली खांद्याची बॅग असा लूक केला होता. 

Suhana Khan in Goa
Nitin Desai Suicide Case : त्या 11 ऑडिओ क्लिप्स सापडल्या, नितीन देसाईंच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेग

सनसेटचा आनंद

या फोटोमध्ये सुहाना तिच्या मैत्रिणीसोबत सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसत आहे. आउटिंगसाठी तिने पांढरा फ्लोरल प्रिंटेड मिडी ड्रेस परिधान केला होता. यात हाफ स्लिव्हज, रुंद नेकलाइन, स्मोक्ड ब्लाऊज,. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com