साऊथ सुपरस्टार महेश बाबूने सपत्निक घेतली बिल गेट्सची भेट

बिल गेट्स भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महेश बाबूचे चाहतेही हा खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
Mahesh Babu meet Bill Gates
Mahesh Babu meet Bill Gatesinsta/ Mahesh babu
Published on
Updated on

साऊथ सुपरस्टार महेश बाबू सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्टी एंजॉय आहेत. तो येथे कुटुंबासह सुट्टी घालवण्यासाठी आला आहे. दरम्यान, महेश बाबू आणि त्याची पत्नी नम्रता शिरोडकर यांनी जगातील सर्वात श्रीमंत आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महेश बाबूचे चाहतेही हा खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. बघता बघता हे फोटो व्हायरल होऊ लागला आहेत.

आज महेश बाबूने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर बिल गेट्ससोबतचा एक फोटो शेअर केला. 'बिल गेट्स यांना भेटणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. तो या जगातील सर्वात प्रेरणादायी व्यक्ती आहे. तो एक अतिशय दयाळू आणि प्रेरणादायी व्यक्ती आहे,'असे कॅप्शन महेश बाबूने या पोस्टला दिले आहे. सर्व चाहत्यांनी या फोटोवर प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला.

Mahesh Babu meet Bill Gates
दाक्षिणात्य अभिनेत्री मीनाचे पती विद्यासागर यांचे निधन

महेश बाबू म्हणजे परफेक्ट फॅनिली मॅन

महेश बाबू कामातून ब्रेक घेऊन सुट्टीसाठी अमेरिकेत गेला आहे. नुकतेच त्याने पत्नी नम्रता शिरोडकरसोबतचे हॉलिडे फोटो शेअर केले आहेत. त्याने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये तो सतत 'व्हॅकेशन मूड' हा हॅशटॅग वापरत आहे. महेश बाबूनेही मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामुळेच अभिनेत्याला परफेक्ट फॅमिली मॅन असेही म्हटले जाते आहे.

Mahesh Babu meet Bill Gates
Ishq Vishk फेम शेनाज ट्रेझरीला झाला गंभीर आजार

महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकर देखील बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री राहिली आहे. पण सध्या ती चित्रपटांपासून दूर आहे आणि सध्या कुटुंबाला वेळ देत आहे. दोघांची पहिली भेट 2000 साली वामसी चित्रपटाच्या सेटवर झाली आणि त्यानंतर दोघे प्रेमात पडले. 2005 मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com