दाक्षिणात्य अभिनेत्री मीनाचे पती विद्यासागर यांचे निधन

South Actress Meena's Husband Death: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मीना यांच्यावर यावेळी दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
South Actress Meena's Husband Death
South Actress Meena's Husband DeathDainik Gomantak
Published on
Updated on

प्रियजन गमावल्याचे दु:ख काय असते, हे ज्याच्यातून जात आहे त्यालाच कळते. नुकतीच साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एका अभिनेत्रीशी संबंधित अशीच दु:खद बातमी समोर आली आहे. साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना हिचे पती विद्यासागर यांचे निधन झाले आहे. आज म्हणजेच 29 जून रोजी सकाळी मीनाच्या पतीचे निधन झाले. (South Actress Meena's Husband Death News)

अभिनेत्री मीना यांच्या पतीचे पती विद्यासागर यांच्या निधनाबद्दल बोलले जात आहे की, ते अनेक महिन्यांपासून आजारी होते. त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाला असून गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांनी काही आठवड्यांपूर्वी विद्यासागर यांच्या फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ब्रेन डेड रुग्णांकडून हे शक्य असल्याने डोनर मिळण्यात अडचणी येत होत्या. तोपर्यंत डॉक्टरांनी औषधोपचार करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांना वाचवू शकला नाही. अभिनेता सरथकुमारने ट्विट (Twit) करून निधनीची माहिती दिली आणि मीना आणि तिच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती व्यक्त केली.

South Actress Meena's Husband Death
Vikram Vedha: हृतिक रोशनच्या 'या' मागणीने विक्रम वेधचे बजेट वाढले अनेक पटींनी

या बातमीने मीनाच्या चाहत्यांमध्येच नव्हे तर संपूर्ण साउथ इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून अभिनेत्रीचे चाहते आणि अनेक सेलिब्रिटी विद्यासागर यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच 29 जून रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विद्यासागर हे व्यवसायाने बंगळुरू येथील व्यापारी असल्याची माहिती आहे. अभिनेत्री मीना आणि विद्यासागर यांनी 2009 मध्ये लग्नगाठ बांधली. दोघांना एक 11 वर्षांची मुलगी नैनिका आहे.

आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली आणि नंतर 90 ते 2000 च्या दशकात मुख्य अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीवर दबदबा निर्माण केला. अभिनेत्रीने जवळपास सर्वच मोठ्या साऊथ सुपरस्टारसोबत काम केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com