Bollywood And South Industry: बॉलिवूडला का घ्यावा लागतोय साऊथच्या फिल्म्सचा आधार...

अलिकडच्या काही चित्रपटांमधुन साऊथचे चित्रपट बाजी मारत असल्याचं समोर आलं आहे.
Bollywood And South Industry
Bollywood And South IndustryDainik Gomantak
Published on
Updated on

2019 मध्ये आलेला सुपरहिट चित्रपट 'वॉर' हा गेल्या वर्षीपर्यंत प्रदर्शित होण्याच्या पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट तर होताच, पण त्याने 300 कोटींच्या क्लबमध्येही धमाकेदार प्रवेश केला होता. 

आदित्य चोप्राच्या स्पाय युनिव्हर्सच्या या चित्रपटात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. अलीकडेच, शाहरुख खानच्या 'पठाण' या स्पाय युनिव्हर्सच्या पुढच्या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम केले. 

पण कोविड नंतर हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये दक्षिण भारतीय चित्रपटातील कलाकारांची झपाट्याने वाढणारी लोकप्रियता लक्षात घेऊन, स्पाय युनिव्हर्सच्या निर्मात्यांनी तेलुगू सुपरस्टार ज्युनियर एनटीआरला वॉर 2 मध्ये हृतिकच्या विरुद्ध खलनायकाची भूमिका करण्यासाठी, वॉरचा सिक्वेल बनवला आहे. 

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ज्युनियर एनटीआरच्या 'आरआरआर' या चित्रपटाने ऑस्कर तर जिंकलेच, पण कमाईचे नवे विक्रमही केले. आता तो 'वॉर 2' चित्रपटात हृतिकला आव्हान देताना दिसणार आहे. तरी, अशीही बातमी समोर येत आहे की, चित्रपटाची स्क्रिप्टही अजून लिहिलेली नाही 

त्याशिवाय, ज्युनियर एनटीआर कधीही दोन नायकांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार नाही. तर. स्पाय युनिव्हर्समध्ये आधीपासूनच सलमान, शाहरुख, जॉन अब्राहम, टायगर आणि हृतिक सारखे मोठे बॉलिवूड स्टार आहेत. पण असे म्हटले जात आहे की 'वॉर 2' मध्ये कोणत्याही बॉलिवूड स्टारऐवजी ज्युनियर एनटीआरला खलनायक म्हणून साईन करण्याची योजना निर्मात्यांनी आखली आहे.

चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांच्या मते, हिंदी भाषिक भागात दक्षिणेकडील चित्रपटातील कलाकारांच्या वेगाने वाढणाऱ्या लोकप्रियतेचा फायदा उठवण्याची तयारी केवळ हृतिक रोशनच करत नाही, तर सलमान आणि शाहरुख सारख्या बॉलीवूड सुपरस्टार्सनेही त्यासाठी तयारी केली आहे. सलमान खानच्या ईदच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'किसी का भाई किसी की जान' या गाण्यात तो तेलुगू स्टार्स रामचरण आणि वेंकटेश यांच्यासोबत दिसला होता. 

त्याचबरोबर सलमानने साऊथ अभिनेत्री पूजा हेगडेलाही चित्रपटाची मुख्य नायिका म्हणून साईन केले आहे. इतकेच नाही तर या चित्रपटात सलमानने तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार जगपती बाबूला कास्ट केले आहे. तर तेलगू स्टार व्यंकटेशनेही चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर शाहरुख खानने जूनमध्ये त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटाची घोषणा केली आहे. 

Bollywood And South Industry
Kangana On Karan Johar: प्रियांका चोप्राने करण जोहरमुळे भारत सोडला ?...कंगना रणौत हे काय म्हणाली...

तमिळ चित्रपटांतील प्रसिद्ध नाव असलेल्या अॅटली यांची दिग्दर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याने आपल्या चित्रपटात सर्व दक्षिण भारतीय स्टार्सना साइन केले आहे. 

तेलुगू अभिनेत्री नयनतारा 'जवान' या चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे, तर तमिळ सुपरस्टार विजय सेतुपतीही या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय शाहरुखने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये कॉमेडियनची भूमिका साकारणाऱ्या योगी बाबूलाही साईन केले आहे, तर मल्याळम अभिनेत्री प्रियामणीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. शाहरुखने तेलगू सुपरस्टार अल्लू अर्जुनलाही त्याच्या चित्रपटात कॅमिओ करण्याची ऑफर दिली होती. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com