"फक्त लहानग्या मुलीसाठी एकत्र..." वर्षभरापूर्वीच झालाय 'या' गायकाचा घटस्फोट, 17 वर्षांचे सूर बिघडले

Rahul Deshpande divorce: राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक महत्त्वाची माहिती जाहीर केली
Marathi singer Rahul Deshpande
Marathi singer Rahul DeshpandeDainik Gomantak
Published on
Updated on

Singer Rahul Deshpande Divorce: राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. त्यांनी पत्नी नेहा देशपांडे यांच्यासोबत १७ वर्षांच्या संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत त्यांनी ही बातमी दिली. त्यांचा कायदेशीर घटस्फोट सप्टेंबर २०२४ मध्येच झाला होता, पण ही माहिती त्यांनी खासगीत ठेवण्याचे ठरवले होते. आता वर्षभरानंतर त्यांनी ही बातमी सार्वजनिक केली आहे.

मुलीसाठी कायम एकत्र

राहुल देशपांडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "१७ वर्षांच्या लग्नानंतर आणि अनेक सुंदर आठवणींनंतर, मी आणि नेहाने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे." त्यांनी पुढे सांगितले की, "हा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही खाजगीरित्या या बदलाला सामोरे जाण्यासाठी वेळ घेतला. आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ती आमची मुलगी रेणुका. ती आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि आम्ही दोघेही तिचे सह-पालक म्हणून एकत्र राहू. तिला प्रेम, साथ आणि स्थैर्य देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत."

संगीत क्षेत्रातील गौरवशाली प्रवास

पंडित वसंतराव देशपांडे यांचे नातू असलेले राहुल देशपांडे हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि मराठी संगीत रंगभूमीतील त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात. 'मी वसंतराव' या त्यांच्या आजोबांच्या जीवनावर आधारित चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारण्यासोबतच पार्श्वगायनही केले होते.

Marathi singer Rahul Deshpande
Govinda-Sunita Divorce: मराठी अभिनेत्रीसोबतच्या अफेयरमुळे गोविंदाचा घटस्फोट? इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल

या चित्रपटातील त्यांच्या कामासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल देशपांडे यांच्या या घोषणेने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला असून, त्यांच्या निर्णयाचा आदर करत अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com