Anup Jalota : तीन लग्नं, स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीशी अफेअर.....वादग्रस्त गायक अनुप जलोटा इंडस्ट्री सोडून कुठं गेले?

गायक अनुप जलोटा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात वादग्रस्त म्हणुनच ओळखले जातात , ग्लॅमरपासुन दूर जाऊन सध्या ते काय करत आहेत? चला पाहुया
Anup Jalota
Anup JalotaDainik Gomantak
Published on
Updated on

अनूप जलोटा हे नाव संगीत रसिकाला माहित नाही असं होऊच शकत नाही. आवाजातल्या पहाडी सुरांनी त्यांनी आजवर प्रेक्षकांच्या पसंतीक्रमात आपलं नाव अव्वल ठेवलं आहे. अनूप जलोटा यांनी 'ऐसी लागी लगन', 'मैं नही मखन खायो', 'रंग दे चुनरिया', 'जग में सुंदर है दो नाम' आणि 'चदरिया झिनी रे झिनी' यासह अनेक प्रसिद्ध भजने गायली आहेत. त्यांना 'भजन सम्राट' असेही म्हणतात. ते 'बिग बॉस 12' मध्ये दिसले होते आणि जसलीन मथारूसोबतच्या अफेअरमुळेही ते प्रचंड चर्चेत होते.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

अनूप जलोटा हे देशातील प्रसिद्ध गायक आहेत. त्यांना 'भजनसम्राट' असेही म्हटले जात असे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे. अनूपजी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी तीन विवाह केले. त्यांनी दोन्ही पत्नींना घटस्फोट दिला आणि त्यांची तिसरी पत्नी मरण पावली. 

बिग बॉसमध्ये दिसले होते

अनुप जलोटा रिअॅलिटी शो 'बिग बॉस 12' मध्ये दिसले होते, जिथे त्यांनी 37 वर्षांनी लहान स्पर्धक जसलीन मथारूसोबत रिलेशनशीपमध्ये होते. शोमधून बाहेर आल्यानंतरही दोघांचे जवळपास साडेतीन वर्षे अफेअर होते.  अनूप जलोटा सध्या कुठे आहेत आणि काय करत आहेत ते जाणून घेऊया.

अनूप जलोटा सध्या परदेशात

अनुप जलोटा सध्या 70 वर्षांचे आहेत. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते सध्या परदेशात लाइव्ह कॉन्सर्ट करतात अशी माहिती मिळाली आहे. त्यांनी अलीकडेच सोशल मिडीयावर लहानपणीचा फोटो शेअर केला होता. गेल्या आठवड्यात त्यांनी न्यू जर्सीमध्ये परफॉर्म केला. 2022 मध्ये आलेल्या 'कार्तूट' सिनेमात आणि 2020 मध्ये 'पाताल लोक' या वेब सिरीजमध्येही ते दिसले होते.

अनूप जलोटा यांचा जन्म

अनूप जलोटा यांचा जन्म 29 जुलै 1953 रोजी नैनिताल, उत्तराखंड येथे झाला. ते एक गायक, संगीतकार आणि अभिनेता आहेत. त्यांना 'भजन सम्राट' म्हटले जाते, कारण त्यांनी भारतीय संगीतात भजनात सर्वाधिक योगदान दिले आहे. 2012 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

अनुप जलोटा यांचं कुटूंब

अनुप जलोटा हे पंजाबच्या शाम चौरासी घराण्यातील आहेत. भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट, लखनौ येथे त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे वडील पुरुषोत्तम दास जलोटा हे देखील प्रख्यात भजन गायक होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी गुजरातमधील सावरकुंडला येथे काही वर्षे घालवली. त्यांना अनिल जलोटा आणि अजय जलोटा असे दोन लहान भाऊ आणि अंजली धीर आणि अनिता मेहरा या दोन बहिणी आहेत.

अनुप जलोटा यांचा स्ट्रगल

अनुप जलोटा यांनी ऑल इंडिया रोडिओमध्ये कोरस गायक म्हणून आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांना तिथे संतूर वादक, ढोलक वादक, सरोद वादक, सारंगी वादक, व्हायोलिन वादक, सतार वादक, तबला वादक आणि गिटार वादक यांची साथ मिळाली. 

'ऐसी लागी लगन', 'मैं नही मखन खायो', 'रंग दे चुनरिया', 'जग में सुंदर है दो नाम' आणि 'चदरिया झिनी रे झिनी' या त्यांच्या काही प्रसिद्ध भजनांना रसिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला .अनुप जलोटा 2002 ते 2005 या काळात ते स्टार प्लसवरील 'धरम और हम' या टेलिकास्ट मालिकेचे प्रेझेंटर देखील होते. 2018 मध्ये त्यांनी सलमान खानच्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीझन 12' मध्ये भाग घेतला होता.

पहिलं लग्न आणि घटस्फोट

अनूप जलोटा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहिले. त्यांनी सोनाली सेठ या गुजराती मुलीशी लग्न केले जी त्यांची संगीत विद्यार्थिनी होती आणि नंतर ती एक प्रसिद्ध गायिका बनली. दोघांनीही घरच्यांच्या संमतीशिवाय लग्न केले होते. 'अनूप आणि सोनाली जलोटा' या नावाने दोघेही लोकप्रिय झाले. मात्र नंतर दोघांचा घटस्फोट झाला.

अनुप जलोटा यांंचं तिसरं लग्न

यानंतर अनूप जलोटा यांनी बीना भाटियासोबत दुसरं लग्न केलं. हे अ‍ॅरेंज्ड मॅरेज होते, पण हे नातेही टिकू शकले नाही आणि दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर अनूपने दिग्दर्शक शेखर कपूर यांची पहिली पत्नी मेघा गुजरालसोबत तिसरे लग्न केले. 

मेधाने 1994 मध्ये शेखर कपूर यांना घटस्फोट दिला आणि अनूप जलोटा यांना साथीदार म्हणून निवडले. अनूप आणि मेघा यांना आर्यमन नावाचा मुलगा आहे. 2014 मध्ये यकृत निकामी झाल्याने मेघाचा मृत्यू झाला. अनूप जलोटा यांचे 'बिग बॉस 12' स्पर्धक जसलीन मथारूसोबत सुमारे साडेतीन वर्षे अफेअर होते. दोघांच्या वयात 37 वर्षांचे अंतर होते. मात्र, जसलीनसोबत माझे शिक्षक-विद्यार्थी नाते असल्याचे अनूपनजींनी सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com