Amar Singh Chamkila Teaser: अलीकडे चित्रपटांमधुन मातीतल्या गोष्टी म्हणजेच स्टोरी फ्रॉम सॉईलचा ट्रेंड आलेला दिसतो. इम्तियाज अलीचा हा चित्रपट मातीतलीच गोष्ट घेऊन आला आहे. सध्या सोशल मिडीयावर 'अमर सिंह चमकीला' याच नावाची चर्चा सुरू आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित अमर सिंह चमकीला या चित्रपटाचा टिजर नुकताच रिलीज झाला आहे.
पंजाबी गायक अमरसिंग चमकीला वादाच्या भोवऱ्यात सापडला आणि हिंसाचारामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याला आणि त्याच्या पत्नीला एका गायकाने गोळ्या घातल्या. अमरसिंह चमकिला यांची गाणी काही लोकांसाठी पोटदुखी ठरली होती .
गायक आणि संगीतकार अमर सिंग चमकीला हे त्यांच्या काळात पंजाबी संगीतातील एक मोठं नाव होतं. 8 मार्च 1988 रोजी त्यांची हत्या झाली. वयाच्या 27 व्या वर्षी त्याची निर्घृण हत्या केली. त्यांच्या जीवनावरची हीच सत्यकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आता चित्रपट निर्माते इम्तियाज अली अमर सिंह चमकिला यांच्या जीवनावर चरित्र तयार करत आहेत. दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा हे इम्तियाज अली दिग्दर्शित आगामी बायोपिक 'चमकिला'मुळे चर्चेत आहेत.
दिवंगत पंजाबी लोक गायक अमर सिंग चमकिला यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.आज 'चमकिला'च्या फर्स्ट लूक टीझर रिलिज करण्यात आला. लोकगायक म्हणून दिलजीतचा हा लूकही टिजरमधुन समोर आला होता
टीझर शेअर करताना दिलजीतने लिहिले, "जो नाम सालों से आपके दिल और दिमाग पे छाया है वो अब आपके सामने आया है. पंजाबचा सर्वाधिक विक्रमी विक्री करणारा कलाकार अमर सिंग #चमकिला यांची अनटोल्ड कथा पहा, लवकरच फक्त नेटफ्लिक्सवर!"
अमरसिंग चमकिला यांनी 80 च्या दशकात त्यांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल, मद्यपान, अंमली पदार्थांचा वापर आणि पंजाबी पुरुषांची पितृसत्ताक मानसिकता यावर भाष्य करणाऱ्या गाण्यांनी प्रसिद्धी मिळवली. तो खुप वादात असायचा.
वादग्रस्त असलं तरी त्यांनी रातोरात प्रसिद्धी मिळवली. पंजाबमधील मेहसमपूर येथे 1988 मध्ये चमकिला आणि त्यांची पत्नी अमरजोत यांची हत्या करण्यात आली होती.
इम्तियाज अली दिग्दर्शित बायोपिकमधील अमर सिंग चमकिला म्हणून दिलजीत दोसांझचा लूक पहिल्या टीझरमध्ये रिलिज होताच व्हायरल झाला आहे. हा टिजर युट्यूबवर रिलीज झाला असुन आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.