HBD Sidharth Malhotra: जिच्यावर प्रेम केलं तिच्याकडूनच अपमान झाला होता...सिद्धार्थची एक जुनी आठवण

आपल्या जुन्या नात्याची एक जुनी आठवण सिद्धार्थने शेअर केली आहे.
Sidharth Malhotra
Sidharth Malhotra Dainik Gomantak

Sidharth Malhotra Birthday Special बॉलिवूडच्या एका हॅंडसम हंकचा आज वाढदिवस आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आता 38 वर्षांचा झाला आहे. कित्येक तरुणींना वेड लावणाऱ्या या अभिनेत्याने आजच्या विशेष त्याच्या एका जुन्या मुलाखतीची वारंवार आठवण येत आहे .

 सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीच्या उंचीवर जात आहे. दरम्यान, त्यांची एक जुनी मुलाखत समोर आली होती, ज्यामध्ये त्याने त्याच्या नात्याची आठवण शेअर केली होती

 सिद्धार्थ मल्होत्राने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक यशस्वीपणे दाखवली आहे.आज, निःसंशयपणे तो आजच्या घडीला बॉलिवूडमधील सर्वात जास्त मागणी असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. 

सिद्धार्थचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. कित्येक फिमेल फॅन्ससाठी तो खुपच लाडका आहे. पण एक काळ असा होता जेव्हा सिद्धार्थने जिच्यावर प्रेम केलं होतं तिनेच त्याच्यावर टीका केली आहे. त्याबद्दलची एक आठवण सिद्धार्थने शेअर केली आहे. यात त्याचा मोठाच अपमान झाला होता. एक प्रियकर प्रेयसीकडून झालेला अपमान विसरू शकत नाही हे मात्र नक्की.

काही काळापूर्वी एका न्यूज पोर्टलला दिलेल्या थ्रोबॅक मुलाखतीत सिद्धार्थ मल्होत्राने हा किस्सा सांगितलं होतं. सिद्धार्थने त्याच्या तुटलेल्या नात्याबद्दल माहिती दिली होती, त्याने सांगितलं की इंडस्ट्रीमध्ये स्वतःसाठी एक स्थान तयार करणे हे सध्या त्याचं प्राधान्य आहे.

सिद्धार्थ म्हणाला की, एका मुलीकडून मला टीकेला सामोरे जावे लागले होत. मला हवा असणारा वेळ मला न देता तिला दुसरेच काम महत्वाचे होते, याच वेळी तिने माझा अपमान केला, त्याचे कारण असे की तिला माझ्यासोबत बाहेर जाण्याऐवजी जिमला जायचे होते. आताही मी एकटा आहे. टीकेमुळे झालेला अपमान साहजिकच सिद्धार्थ विसरला नव्हता. आज त्याच्या वाढदिवसानिमीत्य त्याची ही जुनी आठवण..

Sidharth Malhotra
Mamta Mohandas : 'ममता मोहनदास' आपल्या गंभीर आजारावर हे काय बोलली? चाहते झाले भावुक...

रिलेशनशिपमध्ये असल्याबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला होता, 'अगदी. मला वाटते की आपण सर्व त्यांच्यासाठी पात्र आहोत. मी हळुहळु मोठा होत चाललोय, मुंबईत एकटाच राहतो. त्यामुळे आपल्या सर्वांचाही मी मित्रच आहे.

सिद्धार्थ सध्या कियारा अडवाणीसोबत डेट करत असल्याची चर्चा आहे. जरी ते अद्याप त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे समोर आले नसले तरी, त्यांचे सोशल मीडिया पीडीए, डिनर डेट्स आणि आउटिंग त्यांच्या नात्याबद्दल मोठ्या प्रमाणात बोलतात. दोन्ही लव्हबर्ड्स यावर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com