Father's Day 2022: श्वेता बच्चनने फादर्स डे निमित्त शेअर केला 'Big B' यांच्या चित्रपटातील आयकॉनिक डायलॉग

Shweta Bachchan Latest Photo: श्वेता बच्चनने अमिताभ बच्चनसह एक खास फोटो शेअर केला आहे.
Father's Day| Amitabh Bachchan | Shweta Bachchan
Father's Day| Amitabh Bachchan | Shweta BachchanInstagram
Published on
Updated on

फादर्स डे 2022 च्या निमित्ताने, बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या वडिलांची आठवण करतात आणि त्यांच्यासाठी भावनिक पोस्ट एका खास पद्धतीने शेअर करतात. यानिमित्ताने अमिताभ बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांचा एक फोटोही समोर आला आहे ज्यामध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.

फादर्स डेच्या निमित्ताने स्वतः श्वेता बच्चनने (Shweta Bachchan) तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये दोघेही एकत्र बसून आनंदाने हसताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या मुलीच्या खांद्यावर डोके ठेउन असुन श्वेता सेल्फी काढताना दिसत आहे. हा सुंदर फोटो शेअर करताना श्वेताने तिच्या वडिलांच्या चित्रपटातील एक प्रसिद्ध आयकॉनिक डायलॉगपुन्हा तयार केला आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 'रिश्ते में सिर्फ मेरे.....लगते हैं'.

यासोबत तिने 'फादर्स डे' आणि 'गर्ल डॅड' असे हॅशटॅग वापरले आहेत. सोशल मीडियावर या फोटोला खूप पसंती मिळाली आहे. चाहते दोघांच्या बाँडिंगचे कौतुक करत आहेत. बिग बीने आपल्या चित्रपटांतून (Movie) ज्याप्रकारे स्वत:चे स्थान निर्माण केले आहे त्याचप्रमाणे ते आपल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. विशेषत: त्याची मुलगी श्वेतासोबतची त्याची बाँडिंग खूप खास आहे.

Father's Day| Amitabh Bachchan | Shweta Bachchan
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah चे निर्माते लवकरच दयाबेनची उणीव भरून काढणार

अमिताभ बच्चन लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच ते रश्मिका मंदान्ना आणि नीना गुप्तासोबत 'गुड बाय' आणि दीपिका पदुकोणसोबत 'द इंटर्न' या चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com