Bollywood News: अनारकलीच्या भूमिकेसाठी मधुबालाच्या आधी 'या' अभिनेत्रीला आली होती ऑफर

Mughal E-Azam: नूतन 14 वर्षांची असताना तिला के आसिफचा 'मुघल-ए-आझम' चित्रपटासाठी ऑफर आली होती.
Bollywood News
Bollywood NewsDainik Gomantak
Published on
Updated on

नूतनचे नाव फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 60-70 च्या दशकातील अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये नूतन दिसल्या आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला नूतनच्‍या आयुष्‍यातील काही रंजक घटना सांगणार आहोत. नूतनचा जन्म एका फिल्मी कुटुंबात झाला. नूतनचे (Nutan) वडील कुमारसेन समर्थ हे एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते, तर आई शोभना समर्थ त्यांच्या काळातील एक मोठी अभिनेत्री होती. नूतनला अभिनयाचा वारसा मिळाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नूतनबद्दल असे म्हटले जाते की, लहानपणी ती सावळी आणि उंच होती, त्यामुळे तिला अनेकदा लोक आणि नातेवाईकांचे टोमणे ऐकायला मिळाले. 

लहानपणी या टोमण्यांमुळे नूतन स्वत:ला कुरूप समजू लागल्याचे सांगितले जाते. पण नूतन 14 वर्षांची असताना तिला के. आसिफचा 'मुघल-ए-आझम' (Mughal E-Azam) चित्रपटाची ऑफर आली. या चित्रपटात (Movie) नूतन अनारकलीची भूमिका साकारणार होती. पण त्यांनी भूमिका करण्यास नकार दिला.

Bollywood News
Aamir Khan's New Ad: आमिर खान, कियारा आडवाणीच्या नव्या जाहितीवरून वाद

नूतनबद्दल इतरही अनेक मनोरंजक तथ्ये आहेत, जसे की नूतन या स्विमसूट परिधान करणारी पहिल्या अभिनेत्री होत्या. नूतनने 'दिल्ली का ठग' चित्रपटात स्विमसूट परिधान केला होता आणि नंतर पडद्यावर तो परिधान करणे ही मोठी गोष्ट मानली जात होती. नूतनचे वैयक्तिक आयुष्यही फारसे चर्चेत नव्हते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नूतनचे तिच्या आईसोबत अजिबात जमले नाही आणि जवळपास 20 वर्षांपासून त्यांच्यात संवादही झाला नाही.

खरे तर नूतनने त्यांच्या आईवर पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. त्याचवेळी नूतनची आई शोभना यांनी आरोप केला होता की, नूतन आपल्या पतीच्या नावाखाली हे सर्व करत आहे. 1991 मध्ये कॅन्सरमुळे नूतनचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com