Nikamma Title Track Out
Nikamma Title Track Out Twitter

'निकम्मा'चा टायटल ट्रॅक रिलीज, शिल्पाच्या डान्समुळे चाहत्यांच्या नजरा गाण्याकडे वळल्या

‘निकम्मा’ या बॉलिवूड चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज झाला आहे.
Published on

‘निकम्मा’ या बॉलिवूड चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज झाला आहे. चित्रपटाचे हे गाणे आधीच्या गाण्याचे रिमेक व्हर्जन आहे. ज्यामध्ये मुख्य अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अभिनेता अभिमन्यू दासानी आणि अभिनेत्री शर्ली सेटिया डान्स फ्लोअर नाचतांना दिसत आहेत. या गाण्याचा ट्रॅक आधीच ऐकला असला तरी नव्या रिमेकने या गाण्यात पुन्हा एकदा जीव आणला आहे. हे गाणे 'क्या दिल ने कहा' या चित्रपटातून घेण्यात आले आहे. त्याचबरोबर गाण्याची थीम पार्टीवर आधारित ठेवण्यात आली आहे. (Nikamma Title Track Out)

Nikamma Title Track Out
समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडाचा शूटिंग दरम्यान अपघात

या गाण्यात पुन्हा एकदा अभिनेत्री शिल्पाची हटके स्टाईल पाहायला मिळत आहे. या गाण्यात ती वेस्टर्न लूकमध्ये डान्स करत आहे. त्यामुळे शिल्पाच्या डान्समुळे चाहत्यांच्या नजरा या गाण्याकडे वळल्या आहेत. शिल्पाच्या चित्रपटातील दोन्ही अभिनेते आणि अभिनेत्री अभिमन्यू आणि शर्ली निकम बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहेत.

Nikamma Title Track Out
भाईजानच्या सांगण्यावरून आयुष शर्माने सोडला 'Kabhi Eid Kabhi Diwali'

या गाण्याला जावेद मोहसीनने आवाज दिला आहे. त्याचबरोबर गाण्याचे बोल दानिश साबरी आणि संजय छेल यांनी लिहिले आहेत. हे गाणे देव नेगी, पायली देव आणि डायन सिक्वेरा यांनी गायले आहे. त्याचवेळी हे गाणे सोनी म्युझिक इंडियाच्या यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे.निकम्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन साबीर खान यांनी केले आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात 17 जूनला रिलीज होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com