दाक्षिणात्य सुपरस्टार समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांनी अलीकडेच काश्मीरमध्ये त्यांच्या आगामी 'खुशी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. अलीकडेच या दोघांच्या चित्रपटाशी संबंधित एक ताजी बातमी समोर आली आहे, जी ऐकून समंथा आणि विजयचे चाहते थोडे चिंतेत येऊ शकतात. (Samantha Vijay Accident News)
मिळालेल्या माहितीनुसार स्टंटच्या शूटिंगदरम्यान समंथा (Samantha) आणि विजयचा अपघात झाला होता, ज्यामध्ये त्यांना गंभीर दुखापतही झाली होती. अपघातानंतर दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या चित्रपटाचे दिग्दर्शक शिव निर्वाण यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर काश्मीरमधील 'खुशी' चित्रपटाचे वेळापत्रक आता पूर्ण झाल्याचे फोटो शेअर केले आहे.
* अपघात कसा झाला?
विजय देवरकोंडाच्या टीममधील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, 'समंथा आणि विजय काश्मीरमधील पहलगाम भागात स्टंट सीन करत होते. ज्या दरम्यान ते जखमी झाले, हा सीन खूपच अवघड होता. दोन्ही स्टार लिडर नदीच्या दोन्ही बाजूला बांधलेल्या दोरीवरून वाहन चालवणार होते, परंतु दुर्दैवाने वाहन खोल पाण्यात पडले आणि दोघांच्या पाठीला दुखापत झाली. क्रू मेंबरने सांगितले की, "त्या दिवशीच त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
* उपचार सुरू आहेत..
बातमीनुसार, या अपघातानंतर समंथा आणि विजय रविवारी शूटिंगला परतले. यावेळी त्यांना श्रीनगरच्या दल सरोवरात शूटिंग करायचं होतं, मात्र शूटिंगदरम्यान दोघांनाही पाठदुखीचा त्रास होत होता. त्यानंतर त्यांना दल तलावावरील हॉटेलमध्ये नेण्यात आले आणि तेथे फिजिओथेरपिस्टला बोलावण्यात आले, सध्या दोघांची फिजिओथेरपी सुरू आहे. मात्र, काश्मीर शेड्यूल पूर्ण करून 'खुशी' ची संपूर्ण टीम परत आली आहे.
समंथा आणि विजय देवरकोंडा स्टारर 'खुशी' या चित्रपटाचे (Movie) पोस्टर आणि टायटल ट्रॅक रिलीज झाले आहे. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षक आता दोघांची केमिस्ट्री पडद्यावर पाहण्याची उत्सुक आहेत. सामंथा आणि विजय यांच्याशिवाय मुरली शर्मा, जयराम, सचिन खेडाकर, सरन्या प्रदीप, वेनेला किशोर यांनीही या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्स करत आहे. हा चित्रपट तेलगू, तामीळ, कन्नड या भाषांमध्ये 23 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.