मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हॉलिवूडचा प्रसिद्ध टीव्ही शो अॅबॉट एलिमेंटरीच्या अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका प्रसिद्ध शो च्या जजने आपले शोषण केल्याचे तिने सांगितले. आता हॉलिवूड अभिनेत्री शेरिल ली राल्फने तिच्या आयुष्यातील एक काळे सत्य सर्वांना सांगितले आहे.
चॅनलशी संबंधित प्रत्येकाला याची माहिती होती, पण कोणीही काही केले नाही. तिने असेही सांगितले की एकदा एका व्यक्तिने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याकरण्याचा प्रयत्न केला होता.
ग्लॅमरच्या दुनियेत जितके तारे कॅमेऱ्यासमोर चमकतात, तितकेच त्यांच्या मागे एक अंधारमय जग असते. आता हॉलिवूड अभिनेत्री शेरिल ली राल्फने तिच्या आयुष्यातील एक धक्कादायक सत्य सांगितलं आहे. काही वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध टीव्ही शोच्या जजने कसा लैंगिक अत्याचार केला हे तिने सांगितले आहे.
हॉलिवूडच्या प्रसिद्ध टीव्ही शो एबॉट एलिमेंटरीची अभिनेत्री शेरिलने सांगितले की, चॅनलशी संबंधित प्रत्येकाला माहित होते की 'शो'चा जज तिचे शोषण करत आहेत आहेत, परंतु कोणीही काहीही केले नाही. अनेकवेळा लोकांनी आपल्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. तिने 'मी टू' सहन केले आहे.
शेरिल ली राल्फने वे अप विथ अँजेला यी नावाच्या पॉडकास्टमध्ये भाग घेतला. तिने शोमध्ये दावा केला की एका फेमस टेलिव्हिजन पर्सनॅलिटीने तिच्यावर लैंगिक लैंगिक अत्याचार केले होते. शेरिलने सांगितले की जेव्हा तिने एका मोठ्या नेटवर्क इव्हेंटमध्ये तिच्या शोचे प्रमोशन करण्यास सुरुवात केली तेव्हा तिचे शोषण झाले.
ती म्हणते, 'मी खूप सार्वजनिक ठिकाणी होते. मी सूट घातला होता. मी माझ्या टीव्ही शोशी संबंधित काम करत होते, ज्याचा मी त्यावेळी एक भाग होते. तो आणि मी एकाच नेटवर्कवर काम करायचो.
अधिक माहिती देताना, अभिनेत्री म्हणते, 'तो माणूस आत आला, त्याने माझी मान मागून धरली, मला त्याच्याकडे वळवले आणि माझे चुंबन घेऊ लागला.आणि ही गोष्ट सर्वांनी पाहिली. शेरिलने त्या व्यक्तीचे नाव सांगितले नाही.
ती म्हणाली की शोचा जज ग्रेग मॅथिस याचा या सगळ्याशी काही संबंध नाही तो एक चांगला माणूस आहे. दुसरी घटना शेअर करताना शेरिल ली राल्फ यांनी सांगितले की, एका प्रमोटरने तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर अभिनेत्री वेगवेगळ्या गोष्टींबद्दल विचार करू लागली. भविष्यात अशा गोष्टींपासून स्वतःला कसे वाचवायचे याचा विचार ती करू लागली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.