Sharmila Tagore : 'गुलमोहर'मध्ये शर्मिला टागोर मनोज वाजपेयीच्या आईच्या भूमीकेत

अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी त्यांचा काळ आणि आताचा ओटीटी प्लॅटफॉर्म यातला फरक सांगितला आहे.
Sharmila Tagore
Sharmila TagoreDainik Gomantak
Published on
Updated on

sharmila tagore as manoj vajpayee's mother in 'gulmohar' : अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी 70 चं दशक आपल्या अभिनयाने प्रभावित केलं होतं. आराधना, अमर प्रेम यांसारख्या चित्रपटांतून आपल्या विलक्षण अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या शर्मिला टागोर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्या अभिनयाची जादू पसरवायला तयार आहेत.

'गुलमोहर' या चित्रपटातुन आपल्या अभिनयाचा नवा अध्याय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. या चित्रपटात शर्मिला टागोर यांनी 'मनोज वाजपेयी'च्या आईची भूमीका केली आहे.

अभिनय क्षेत्रात 60 वर्षांनंतरही तुम्ही नवीन काहीतरी करू शकता. आणि हेच शर्मिला टागोर यांनी सिद्ध केलं आहे . ब्रेक के बाद (2010) मध्ये त्या पडद्यावर शेवटच्या दिसल्या होत्या आणि आता थेट या आठवड्यात गुलमोहरमधून ओटीटीवर पदार्पण करत आहे.

 60 च्या दशकात व्हॅनिटी व्हॅनशिवाय शूटिंग करण्यापासून, सध्याच्या काळात ओटीटी प्रोजेक्टच्या चर्चेत येण्यापर्यंत, शर्मिला टागोर त्यांच्या कामाच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल केला आहे. त्यांचा काळ ओटीटीच्या काळातला बदल सांगताना त्या म्हणाल्या, “मला आठवतं अमिताभ बच्चन यांना पहिली व्हॅनिटी मिळेपर्यंत व्हॅनिटी व्हॅन नव्हती

Sharmila Tagore
Salman Khan Unseen Photo: सलमानने शेअर केला 'किसी का भाई किसी की जान' च्या सेटवरील खास फोटो

पुढे त्या म्हणाल्या आता, चित्रपटांमध्ये काम करणे अधिक सोयीस्कर झाले आहे आणि ओटीटी तर आणखी व्यवस्थित आहे. सगळेच वक्तशीर आहेत. गुलमोहरसाठी शूटिंग करत असताना, सर्वकाही स्पॉट-ऑन होते — पहिल्या शॉटपासून ते कॉस्च्युमपर्यंत, तुम्ही पॅक अप करण्याच्या वेळेपर्यंत,” मला आश्चर्यच वाटतं.

गुलमोहर हा चित्रपट 3 मार्चला म्हणजेच 2 दिवसांत हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर बघायला मिळेल. हा चित्रपट राहुल चिट्टेला यांनी दिग्दर्शित केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com