Ashish Vidyarthi Honeymoon: रुपाली बरुआसोबतचा फोटो शेअर करत आशिष म्हणतात- वय कुठेच ...

Ashish Vidyarthi: 'आम्हाला वाटले की आम्ही नवरा-बायको म्हणून एकत्र पुढचा प्रवास करु शकतो.'
Ashish Vidyarthi Marriage
Ashish Vidyarthi MarriageDainik Gomantak
Published on
Updated on

Ashish Vidyarthi: बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. 25 मे ला वयाच्या 57 व्या वर्षी कोलकत्ता येथे रुपाली बरुआ यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

गुरुवारी आशिष विद्यार्थी यांनी इंस्टाग्रामवर रुपाली यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोखाली त्यांनी थॅक्यू डिअर दोस्त, फॉर युवर लव्ह अॅंड विशेष असे म्हटले आहे. यानंतर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी त्यांच्यावर टीकादेखील केली आहे. एका इंस्टाग्राम युजरने म्हटले आहे की, आम्ही तुम्हाला चांगला अभिनेता मानत होतो, मात्र तुम्ही एकाला सोडून दुसरीबरोबर लग्न केले हे चांगले केले नाही असे म्हटले आहे. तर काहींनी मेड फॉर इच ऑदर असे म्हटले आहे.

याआधीदेखील आशिष यांच्या लग्नानंतरदेखील अनेकांनी टीका केली होती. त्यांनतर त्यांनी सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत आपले मत मांडले होते. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ आणि त्यांची ओळख कशी झाली , याबरोबरच लग्नापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता हे सांगितले आहे.

Ashish Vidyarthi Marriage
Happy Birthday Imtiaz Ali: 'जब वी मेट' ते 'रॉकस्टार'; एकापेक्षा एक हिट देणारा इम्तियाज अली झाला 52 वर्षाचा

'आम्ही सोशल मिडियावर भेटलो, एकमेकांसोबत बोलायला सुरुवात केली , एका वर्षापाठीमागे प्रत्यक्षात भेटलो.

आम्हाला आपल्या लग्नाबद्दल बोलताना म्हटले आहे की, आम्हाला वाटले की आम्ही नवरा-बायको म्हणून एकत्र पुढचा प्रवास करु शकतो. म्हणून आम्ही लग्न केले आहे. आत्ता रुपाली 50 वर्षाची आहे तर मी 57 वर्षाचा आहे, परंतु वय कुठेच आपल्या आनंदाच्या मध्ये येत नाही. आपल्यापैकी प्रत्येकजण आनंदी होऊ शकतो. सन्मानाने जगत राहा, फक्त तुम्हाला माहीती असायला हवे की, लोक कसे आयुष्य जगतात.'

‘बिच्छू’, ‘अर्जुन पंडित’, ‘जिद्दी’, ‘बादल’ यांसारख्या चित्रपटात त्यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतील उतरल्याचे दिसून आले आहे. याबरोबरच, आशिष विद्यार्थी यांनी तमिळ, मल्याळम, कन्नड अशा 11 हून अधिक भाषांमध्ये काम केलं आहे. आजपर्यंत त्यांनी जवळपास 200 चित्रपटात काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com