Amir Khan Controversy : आमिर हे बरं नाही! चीनच्या मुद्द्यावरुन आमिर का होतोय ट्रोल?

अभिनेता आमिर खानने सध्या पेटत असलेल्या भारत -चीन मुद्द्यावर असं विधान केलं आहे की त्यामुळे तो सोशल मिडीयावर ट्रोल होत आहे.
Amir Khan
Amir KhanDainik Gomantak
Published on
Updated on

अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर बरेच काही बदलले आहे. एकीकडे भारताने चायनीज गोष्टींवर बहिष्कार टाकला आहे.भारत - चीन संघर्षाच्या काळात बॉलिवूड अभिनेता आमिर खानला मात्र चिनी चित्रपटांचे प्रमोशन करणे भोवले आहे.

आमिर खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो चाहत्यांना Never Say Never  हा चीनी चित्रपट पाहण्याचे आवाहन करत आहे. तर दुसरीकडे चीनमध्ये भारतीय चित्रपट 'भारतीयन'वर बहिष्कार टाकण्यात येत आहे. आता आमिर खानचे चायनीज प्रेम पाहून त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

आमिरचा चीनी चित्रपटाला पाठिंबा

वास्तविक आमिर खानचा एक व्हिडिओ ग्लोबल टाइम्सने ट्विट केलाय. या व्हिडिओमध्ये आमिर खान त्याचा मित्र आणि चीनी दिग्दर्शक वांग बाओकियांगच्या Never Say Never या नवीन चित्रपटाला सपोर्ट करतोय. हा चित्रपट 6 जुलै रोजी चीनी भाषेत प्रदर्शित झाला आहे.

आमिर झाला ट्रोल

आमिर खान म्हणाला की, हा सिनेमा एकदम उत्साहवर्धक आहे.. मला आशा आहे की हा चीनी चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडू शकेल. आता आमिरचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.

या व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. काही युजर्स आमिर खानला मोदीविरोधी म्हणत आहेत, तर काही लोकांचे म्हणणे आहे की, आमिर खानचे चीन आणि पाकिस्तानवरील प्रेम उतु जात आहे.

Amir Khan
Abhishek Bachchan: आई-वडीलांप्रमाणेच राजकारणात नशीब अजमावणार का? अभिषेक म्हणाला...

आमिरचे फॅन्स चीनमध्ये

आमिर खानच्या सिनेमांना चीनमध्ये जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. आमिर खानच्या चित्रपटांनी चीनमध्ये चांगली कमाई केली आहे. ज्यामध्ये 3 इडियट्स ते दंगल सारख्या चित्रपटांना चीनमध्ये खूप प्रेम मिळाले. आमिर खानचे चित्रपट चीनमध्ये खूप पसंत केले जातात.

त्याचवेळी 'भारतीयन' या भारतीय चित्रपटाला चीनमध्ये विरोध होत आहे. या चित्रपटात भारत आणि चीनमधील संबंध चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे बोलले जात आहे. दोन्ही देशांमधील संबंध वस्तुस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून दाखवण्यात आले आहेत. तर भारतातील काही लोक याला देशभक्तीपर चित्रपट म्हणत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com