Shankar Mahadevan : शंकर महादेवन यांचं 'देवो के देव महादेव' हे नवं गाणं रिलीज

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचं नवं गाणं महाशिवरात्रीच्या आधीच रिलीज झालं आहे
Shankar Mahadevan
Shankar MahadevanDainik Gomantak
Published on
Updated on

Shankar Mahadevan New Song: हिंदी आणि इतर भाषांत आपल्या गोड आणि अनेकदा ताल धरायला लावणाऱ्या गाण्याने रसिकांना वेड लावणारे गायक, संगीतकार शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांची शिवभक्ती सगळ्यांना माहित आहे. आता शंकर महादेवन यांचं एक नवं गाणं रिलीज झालं आहे, ज्यात भगवान शिवाची महती सांगितली आहे.

अनेत 'दिल चाहता है', 'माही वे', 'कजरा रे' 'लक्ष्य' 'भाग मिल्खा भाग' आणि इतर असंख्य हिट चित्रपटांसाठी ओळखले जाणारे गायक-संगीतकार शंकर महादेवन यांनी महाशिवरात्रीच्या आधी 'देवो के देव महादेव' हे नवीन भक्तीगीत रिलीज केले. बुधवार. ट्रॅक म्हणजे भगवान शिवाला केलेली एक आराधना आहे.

या गाण्याबद्दल बोलताना, 'अरनमानाई 3' आणि 'कट्यार काळजात घुसली' सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केलेले गायक-संगीतकार म्हणाले शंकर महादेवन म्हणाले : “हे गाणे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि ते एका शिवभक्ताच्या भावनांना योग्यरित्या हात घालते. मी एक शिवभक्त आहे, त्यामुळे या गाण्याने मला स्वाभाविकपणे त्याकडे खेचले आणि मला आशा आहे की मी या गाण्याला न्याय दिला आहे.”

Shankar Mahadevan
Swara Bhaskar: स्वरा भास्करचे जुने ट्विट झाले व्हायरल, भाऊ बनला...

शंकर महादेवन यांचे गाणे सर्वशक्तिमानाच्या शोधात तरुणाच्या प्रवासाची कहाणी दर्शवते. प्रवासात, तरुणाला कळते की निःस्वार्थ सेवा हीच भगवान शिवाची परम उपासना आहे. ट्रॅकसाठीचा म्युझिक व्हिडिओ लोणावळ्याच्या निर्मनुष्य भागात शूट केलं गेलं आहे, अंजना शाह या म्युझिक व्हिडिओच्या निर्मात्या आहेत .

यापूर्वी आपल्या आवाजाच्या प्रचंड उर्जेने मुळात उर्जादायी असणारं शिवतांडव स्तोत्रम शंकर महादेवन यांनी गायलं होतं. त्यांच्या शिवतांडव स्तोत्रमचं खूपच कौतुक झालं होतं. याही गाण्याला रसिकांचा आणि विशेषत: शिवभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com