Kartik Aryan : कार्तिक आर्यनच्या स्टारडमला मोठा धक्का; 'शहजादा' कमाईच्या बाबतीत फुस्स...

शहजादा हा कार्तिक आर्यनचा चित्रपट प्रेक्षकांकडून नाकारला गेला आहे, कमाईच्या बाबतीत चित्रपटाला म्हणावं तेवढं यश मिळताना दिसत नाही.
Kartik Aryan
Kartik AryanDainik Gomantak

कार्तिक आर्यनने गेल्या काही चित्रपटांमधून एक मोठं स्टारडम मिळवलं आहे ;पण शहजादा या चित्रपटाने त्याच्या स्टारडमला एक धक्का बसला आहे. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला 'शहजादा' चित्रपट कार्तिकच्याच गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या 'भूल भुलैया 2' च्या तुलनेत अगदीच फिका पडला आहे. 

'भूल भुलैया 2' हा चित्रपट गाजला तो मंजुलिका या पात्रामुळे, पण त्या चित्रपटाच्या यशाचे सर्व श्रेय कार्तिकने घेण्याचा प्रयत्न केला होता. आता 'शहजादा' फ्लॉप ठरला आहे त्यामुळे आता कार्तिकला त्याचं स्टारडम परत मिळवण्यासाठी पुन्हा एकदा झगडावं लागणार हे नक्की.

सुमारे 85 कोटी इतकं बजेट असलेल्या 'शहजादा' चित्रपटासाठी आपल्या फीचा त्याग करून कार्तिक आर्यन या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या टीममध्ये सामील झाला. पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शन चित्रपटाच्या एकूण खर्चाच्या 10 टक्केही कलेक्शन न झाल्याने आता ही धोक्याची घंटा मानली जात आहे. 

या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी सुमारे 6 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 6.65 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 7.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशाप्रकारे चित्रपटाची पहिल्या वीकेंडची कमाई 20 कोटींपर्यंतही पोहोचेल असे वाटत नाही. ही कमाई खूपच कमी आहे

'शहजादा' चित्रपटाच्या धडाकेबाज प्रमोशनमुळेही चित्रपटाचे बरेच नुकसान झाले आहे. कार्तिक आर्यनचा बहुचर्चित ताजमहाल दौरा देखील किमान तीनदा आणि चौथ्यांदा पुन्हा शेड्यूल, रद्द आणि रीशेड्यूल करण्यात आला. यामागील कारण सांगण्यात आले की, चित्रपट निर्मिती कंपनी टी-सीरीज आणि कार्तिक आर्यन यांच्यात गाणे रिलीज करण्याबाबत कोणताही समन्वय नव्हता. 

सुरुवातीला रोमँटिक अॅक्शन कॉमेडी म्हणून कौटुंबिक मनोरंजनाची जाहिरात केली गेली होती त्याचा चित्रपटाला फटका बसला. चित्रपटाची मार्केटिंग टीम ठरवू शकली नाही की हा चित्रपट कार्तिक आर्यनचा पहिला अॅक्शन चित्रपट आहे, रोमँटिक कॉमेडी आहे की कौटुंबिक मनोरंजन आहे. साहजिकच प्रेक्षकही कन्फ्यूज झाले

या सगळ्यामुळे 'शेहजादा' चित्रपटाचे पहिल्या वीकेंडचे कलेक्शन इतके खराब झाले आहे की ते कार्तिकच्या सुपरफ्लॉप चित्रपट 'लव्ह आज कल'पेक्षाही खाली गेले आहे. 14 फेब्रुवारी 2020 रोजी रिलीज झालेल्या 'लव्ह आज कल' या चित्रपटाने 12 कोटींची ओपनिंग केली होती. 

या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये 26 कोटींची कमाई केली आणि त्यानंतर पहिल्या आठवड्यात केवळ 32.60 कोटींची कमाई करून चित्रपट फ्लॉप झाला. या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर एकूण 34.99 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com