Shahrukh Khan Viral Photo : वर्ल्ड कपची ट्रॉफी किंग खानच्या हातात? शाहरुखच्या व्हायरल फोटोने चर्चांना उधाण..

अभिनेता शाहरुख खानचा एक फोटो सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Shahrukh Khan Viral Photo
Shahrukh Khan Viral PhotoDainik Gomantak
Published on
Updated on

सध्या किंग खान अर्थात शाहरुख खानचे स्टार्स खूपच चमचमतायत, बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा त्याच्या एका फोटोमुळे भलताच चर्चेत आला आहे. तो फोटो आहे यंदाच्या वर्ल्ड कपचा. यावर्षी भारतात वर्ल्ड कप थरार रंगणार आहे. पाच ऑक्टोबरपासून या महासंग्रामाला सुरुवात होणार आहे. यात भारताचा पहिला सामना आठ ऑक्टोबरला होणार असून हायव्होल्टेज सामना भारत Vs पाकिस्तान पंधरा ऑक्टोबरला होणार आहे.

वर्ल्ड कपसाठी वातावरण निर्मिती

गेल्या काही दिवसांपासून आयसीसीनं वेगवेगळ्या प्रकारे वर्ल्ड कपसाठी वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. अशात बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या त्या फोटोनं वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. काहींनी तर शाहरुख हा आता वर्ल्ड कपचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे का असा प्रश्नही आयसीसीला केला आहे. आय़सीसीनं त्यांच्या अधिकृत ट्विटवरुन शाहरुखचा हातात वर्ल्ड कप असलेला फोटो शेयर केला आहे.

किंग खानच्या हातात वर्ल्ड कप

किंग खानला आयसीसी २०२३ ट्रॉफी हातात उंचावलेली दिसते आहे. ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. अशा शब्दांत किंग खानचा गौरव केला आहे. यापूर्वी कोणत्याही बॉलीवूडच्या अभिनेत्यानं वर्ल्ड कप पूर्वी ती ट्रॉफीसोबत फोटो शेयर केलेला नाही. त्यामुळे यावेळी आय़सीसीनं शाहरुख सोबत तो फोटो शेयर करणे सगळ्यांसाठी आश्चर्याची बाब मानली जात आहे.

किंग खानवर कौतुकाचा वर्षाव

दुसरीकडे शाहरुखच्या त्या फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. किंग खाननं ट्रॉफीला हात लावला म्हणजे आता आपण विजयी होणारच. अशा आशयाच्या प्रतिक्रिया त्या ट्विटवरुन व्हायरल होताना दिसत आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड असा होणार असून भारतामध्ये वर्ल्ड कपची वातावरण निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.

Shahrukh Khan Viral Photo
Movie Based on India - Pakistan : सीमा हैदरची गोष्ट भारतीय चित्रपटांनी पूर्वीही दाखवलीय, हे 8 चित्रपट पाहाच

या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. त्याच वेळी संपूर्ण स्पर्धा एकूण 10 ठिकाणी खेळवली जाणार आहे. मेगा इव्हेंटमध्ये एकूण 48 सामने होणार आहेत, जे 46 दिवसांत खेळवले जातील. अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, धर्मशाला, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे शहरांचा समावेश आहे. तर हैदराबादसह गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममध्ये सराव सामने खेळवले जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com