Shahrukh's Dunky : शाहरुख म्हणतो माझे चित्रपट राष्ट्रीय एकात्मता दाखवतात.. 'जवान'नंतर आता 'डंकी'चा डंका...

जवानच्या तुफान यशानंतर आता अभिनेता शाहरुख खान राजकुमार हिराणी दिग्दर्शित डंकी या आगामी चित्रपटाच्या रिलीजची तयारी करत आहे.
Shahrukh's Dunky
Shahrukh's DunkyDainik Gomantak

गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानच्या जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला आहे. 4 दिवसांत 500 कोटींचा टप्पा गाठणारा जवान हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.

शाहरुखच्या 'जवान'ने आणि याआधी रिलीज झालेल्या 'पठान'ने बॉक्स ऑफिसवर मिळवलेलं यश पाहुन इंडस्ट्रीतल्या सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आता शाहरुख त्याच्या आगामी डंकी चित्रपटाच्या रिलीजची तयारी करत आहे. शाहरुखने स्वत: डंकीच्या रिलीजची अपडेट दिली आहे.

'डंकी'चं दिग्दर्शन

डंकीचं दिग्दर्शन बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी केलं आहे. थ्री इडियट्स, मुन्ना भाई एमबीबीएस, पीके यांसारखे मास्टरपीस दिग्दर्शित केलेले राजकुमार हिराणी आता 'डंकी' या नावातच वेगळेपण असणाऱ्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

डंकीची रिलीज डेट

स्टार स्टेड इव्हेंटमध्ये, शाहरुख खानने राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकीच्या रिलीजच्या तारखेबद्दल सांगितले आहे.

शाहरुखने सांगितल्याप्रमाणे  हा चित्रपट या वर्षी 22 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. या ख्रिसमन्समध्ये शाहरुखच्या चाहत्यांसाठी हे मोठं गिफ्ट असणार आहे. 

शाहरुख म्हणतो माझे चित्रपट

“आम्ही २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाला सुरुवात केली; हा एक चांगला, शुभ दिवस आहे. त्यानंतर जन्माष्टमीला, भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिनी, आम्ही जवान चित्रपट प्रदर्शित केला. आणि आता नाताळला डंकी प्रदर्शित करणार आहोत.

आपल्या चित्रपटाबद्दल शाहरुख म्हणतो मै राष्ट्रीय एकात्मता राखता हूं. वैसे भी जब मेरी फिल्म रिलीज होती है ते ईद होती ही है, " ...

एक मोठा प्रवास

यापूर्वी, रेड सी फेस्टिव्हलदरम्यान डेडलाइनला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत, शाहरुखने चित्रपटाच्या कथेबद्दल सांगितले की “ही अशा लोकांची कथा आहे ज्यांना शेवटी फोन आल्यावर घरी परत यायचे आहे”.

 “हा एक मोठा प्रवास दाखवणारा चित्रपट आहे, तो जगभरातील वेगवेगळ्या भागातून जातो आणि शेवटी भारतात परत येतो,” सुपरस्टार म्हणाला.

Shahrukh's Dunky
SIIMA Awards 2023 : RRR आणि 'कांतारा'चा पुन्हा सन्मान... ज्युनिअर NTR ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता...पुरस्कार सोहळ्याची यादी पाहा

डंकीची गोष्ट

उल्लेखनीय म्हणजे, शाहरुख खान जवान मधील दुहेरी भूमिकेसाठी सर्व स्तरातून सर्व प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव करत आहे. 

तो आता त्याच्या पुढच्या रिलीज डंकीच्या तयारीला लागला आहे ज्यात अभिनेत्री तापसी पन्नू देखील दिसणार आहे. 

डंकी हा चित्रपट एका आर्मी ऑफिसरची गोष्ट सांगणार आहे असं एकंदरित पोस्टर आणि चित्रपटाची झलक सांगते

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com