Dunki updates : 'जवान'नंतर दिवाळीत फुटणार डंकीचा फटाका...शाहरुखच्या चाहत्यांसाठी मोठी अपडेट
शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण, नयनतारा आणि विजय सेतुपती दिसणार आहेत.
दुसरीकडे, प्रेक्षक शाहरुखच्या आगामी 'डंकी' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे ;आणि ही अपडेट ऐकून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
टिजर लवकरच रिलीज
मिळालेल्या माहितीनुसार शाहरुखच्या डंकीचा टिझर लवकरच रिलीज होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर शाहरुख खान मोठा धमाका करणार असल्याचे मानले जात आहे. सर्वांना दिवाळीचे गिफ्ट देत, निर्माते लवकरच 'डंकी'चा टीझर रिलीज करण्याचा विचार करत आहेत.
दिवाळीचा सण जसजसा जवळ येत आहे तसतसा रसिकांचा उत्साह वाढत आहे. राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला हा चित्रपट त्यांचा चित्रपटाच्या वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहे ;पण, अद्याप निर्माते किंवा किंग खानकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
चित्रपटाची कथा
डंकी चित्रपटात शाहरुख खानने अशा लोकांची कहाणी सांगितली आहे जे परदेशात जाऊन अडकतात आणि नंतर मायदेशी परत येऊ इच्छितात. या चित्रपटात तापसी पन्नू देखील आहे. ती शाहरुखची नायिका म्हणून पहिल्यांदाच चित्रपटात दिसणार आहे.
'डंकी' डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. शाहरुख खानचा पठाण हा यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे आणि सप्टेंबरमध्ये येणारा जवान बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडेल असा विश्वास आहे.
डंकी डिसेंबरमध्ये रिलीज होणार...
डंकी शाहरुख खानकडून चाहत्यांसाठी दिवाळीची मोठी भेट ठरू शकतो. चित्रपटात अशा लोकांची गोष्ट सांगितली आहे जे चुकीच्या मार्गाने परदेशात जातात आणि अडकतात आणि नंतर मायदेशी परत येऊ इच्छितात. या चित्रपटात तापसी पन्नू देखील आहे. ती शाहरुखची नायिका म्हणून पहिल्यांदाच चित्रपटात दिसणार आहे. डंकी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

